नव्या वर्षात विदेशी मद्य महागणार

0

मुंबई (प्रतिनिधी) :

नव्या वर्षांत तळीरामांसाठी खिशाला कात्री लागणार आहे. कारण, आता विदेशी मद्याच्या किंमती वाढणार आहेत. राज्य शासनाकडून उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आल्याने ही किंमत वाढ होणार आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीत ५०० कोटींची भर पडणार आहे.

विविध योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर सध्या मोठा भार आहे. त्यामुळे आपले उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच हा भाग असल्याचे बोलले जात आहे. राज्य शासनाने नुकताच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केला. त्यामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त २४ हजार ४८५ कोटी रुपयांचा वार्षिक बोजा पडणार आहे.

त्यामुळेच देशात तयार होणाऱ्या विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात सुमारे १८ ते २० टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या महसुलात वर्षाला ५०० कोटींची भर पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here