दुध काढणी यंत्र खरेदीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची बिनव्याजी ‘गोवर्धन दुध संजीवनी योजना’

0

कोल्हापूर: दुध उत्पादनामध्ये अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि गोवर्धन दुध काढणी यंत्राचे निर्माते मयुरेश टेक्नोलॉजी यांनी सर्व प्रकारच्या दुध काढणी यंत्र खरेदीसाठी गोवर्धन दुध संजीवनी योजना कार्यान्वित केली आहे. जिल्हा बँकेचे विक्री विभागाचे व्यवस्थापक रणवीर चव्हाण यांनी हि माहिती दिली.

दुध उत्पादकांच्या गरजेचा आणि आर्थिक क्षमतेचा विचार करून हि योजना तयार केली आहे. शून्य टक्के व्याजदर असणाऱ्या या योजनेसाठी कोणत्याही तारण अथवा जामीनदाराची गरज नाही. फक्त दुध संस्थेच्या हमी पत्रावर त्वरित कर्ज मंजूर होणार आहे. ६ महिने मुदतीच्या   कालावधीचा हप्ता शेतकऱ्यांना सहज परवडेल असा आहे. असे ते म्हणाले.

मयुरेश टेक्नॉलॉजीचे संजीव गोखले म्हणाले गेल्या १० वर्षापासून महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात आमचे समाधानी ग्राहक आहेत. अनेक शेतकऱ्यांची हे मशीन हप्त्यावर मिळावे हि मागणी होती. जिल्ह्या बँकेच्या सहकार्याने आम्ही ती पूर्ण करीत असल्याने आनंद होत आहे.

संपूर्ण भारतीय बनावटीचे असणाऱ्या या यंत्राच्या सहाय्याने जनावरांची धार संपूर्ण आणि विनासायास काढता येते. दर्जेदार दुध संकलन करता येते आणि वेळही वाचतो. यामुळे दुध उत्पादनात देखील वाढ होणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त दुध उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा  लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने करण्यात आले.

अधिक माहितीसाठी 9371921349 / 7559479998 / 9595188883  या नंबरवर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here