औरंगाबादच्या सुशोभीकरणासाठी लोकचळवळ उभी करा – डॉ. पुरूषोत्तम भापकर

0

-राजू म्हस्के-

औरंगाबाद: जागतिक नकाशावर महत्वपूर्ण असलेल्या ऐतिहासिक, पर्यटन आणि औद्येागिकदृष्ट्या औरंगाबादच्या सुशोभिकरणात स्थानिक लोकप्रतिनीधी, प्रशासन आणि  उद्योग कंपन्यांनी पुढाकार घेऊन लोकचळवळ उभी करावी असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आज केले.

विभागीय आयुक्तांच्या दालनात औरंगाबाद सुशोभीकरण, वृक्षलागवड आणि खामनदीच्या पुनर्रजीवनाबाबत डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीसाठी मसीआ, सीआयआय, सीएमआयए कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर, अपर विभागीय आयुक्त प्रल्हाद कचरे, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.बी. नाथ, उपायुक्त महिंद्र हरपाळकर, उपमुख्य कार्य अधिकारी अनंत कुभार, गोळेगांवचे सरपंच संतोष जोशी, पाणी फाऊंडेशनचे सुनिल शिंदे, अधिक्षक कृषी अधिकारी पी.एस. शिंदे, आदींसह शहरातील प्रमुख कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

औरंगाबाद येथील विमानतळाची संरक्षक भिंत रंगविणे, क्रांती चौकाचे सौंदर्यीकरण करणे त्याचबरोबर विमानतळ ते शेंद्रा रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्याची जबाबदारी ‘मसीआ’ कंपनीने सामाजिक उत्तरादयित्वातून (सीएसआर) स्विकारली आहे.  इतर कंपन्या, संस्थांने आणि संघटनांनी जिल्ह्याच्या  सुशोभिकरणासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंगोपन, आदींसह आवश्यक उपाययोजना सी.एस.आर निधीतून करण्यासाठी पुढाकार घ्यावा. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव 15 नोव्हेंबरपर्यंत मनपाचे सिकंदर अली यांच्याकडे सादर करावा. या प्रस्तावाची प्रत विभागीय आयुक्त कार्यालयाला सादर करावी. गोळेगांव येथे पाणी फाऊंडेशनमार्फत मोठ्याप्रमाणात वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर याठिकाणी पाणी फाऊंडेशनमार्फत प्रशिक्षण संस्था उभारण्यात आली असून प्रशिक्षणार्थींसाठी स्नानगृहे आणि स्वच्छता गृहे सी.एस.आर निधीतून उभारावी अशा सुचनाही विभागीय आयुक्त यांनी उपस्थित उद्योजकांना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here