घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्राला कायाकल्प पुरस्काराअंतर्गत प्रथम पारितोषिक

स्वच्छता व उपलब्ध सोईसुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी “कायाकल्प” ही योजना सुरु करण्यात आली

0

प्रतिनिधी -योगेश चांदेकर

पालघर : जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र उत्र्कृष्ट दर्जाची असावी व त्यांच्या माध्यमातून तळागळातील गरजू रुग्णांना उत्तम दर्ज्याच्या आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात यासाठी प्रत्यक आरोग्य केंद्राच्या अधिकारी-कर्मचारी वर्गानी प्रयत्नशील राहावे असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत “कायाकल्प” पुरस्कार वितरण केले. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उत्कृष्ट प्रोटोकोल अवलंभ करून चांगल्या, स्वच्छ व आरोग्यासंपन्न सेवा देण्यासाठी घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम, जामसर प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, आशागड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि साकुर प्राथमिक आरोग्य केंद्राला द्वितीय कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात आले.

तसेच सर्वउत्कृष्ट आरोग्य केंद्र विजेतांनी शेवटच्या ५ आरोग्य केंद्रांना भेट देऊन तेथील आरोग्य केंद्रात सुधारनात्मक उपाययोजना करण्यास सहकार्य करावे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी यावेळी केले. यावेळी विजयी ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांने अनेक समस्यांवर मात करून विजय मिळविल्या बदल उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत  प्रधानमंत्री यांनी  २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छते संबंधी प्रचार व प्रसार करण्याकरिता ही मोहीम सुरु केली त्यानुसार सरकारी रुग्णालयातील स्वच्छता व उपलब्ध सोईसुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी “कायाकल्प” ही योजना सुरु करण्यात आली. ह्या अंतर्गत आरोग्य संस्थांच्या सुविधा ह्या अप्रतिम स्वच्छता, वैयक्तिक  स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रण करणाऱ्या संस्थाना दर वर्षी ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार देण्यासाठी संस्थात्मक सोईसुविधा, सैनिटेशन आणि हयजेनिक प्रक्तीसेस, कचरा वर्गीकरण, संसर्ग नियंत्रण, सपोर्ट स्टाफ व्यस्थापन आणि स्वच्छता संबंधीत जागरूकता ही प्रमाणिके लावण्यात आलेली आहेत. यानुसार उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्राला रोख रक्कम २ लक्ष व द्वितीय क्रमांक विजेताना प्रत्येकी ५० हजार रुपय व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. यातील ७५ % रक्कम रुग्ण्कल्याण समितीला तर २५% रक्कम ही संस्थेतील कर्मचार्यांना इंसेंटीव म्हणून दिली जाते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here