वित्तीय संरचनेतील दुवा : लेखा व कोषागारे विभाग

0

लेखा व  कोषागारे संचालनालयाची स्थापना दि. 01 जानेवारी 1962  रोजी करण्यात आली. संचालनालयाच्या स्थापनेमुळे पुर्वी वित्त विभागाच्या थेट नियंत्रणाखाली असलेली कोषागारे, स्थानिक निधी लेखापरीक्षालेखा अधिकारी (प्रशिक्षण)भांडार पडताळणी व दक्षता पथके यांच्याकडील लेखाविषयक कामे संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली. शासनाने फेब्रुवारी 1965 पासून महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना केली. तेव्हापासून 1 फेब्रुवारी हा कोषागार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

लेखा व कोषागारे संचालनालयाची स्थापना झाल्यापासून कोषागाराचे तात्काळ नियंत्रण संचालकलेखा व कोषागारेमहाराष्ट्र राज्यमुंबई यांच्याकडे विभागप्रमुख या नात्याने सोपविण्यात आले. कोषागाराप्रमाणेच तहसीलस्तरावरील 24 उपकोषागारांचा एक गट दिनांक 1 एप्रिल 1964 रोजी आणि 98 उपकोषागारांचा आणखी एक गट दिनांक 1 जून 1968 रोजी वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात आला. आता राज्यातील सर्व कोषागारे/उपकोषागारे वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असून संचालक लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई या विभागप्रमुखांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. तसेच प्रशासकीय कामकाज गतिमानपणे व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कोकण, पुणे, नाशिक, अमरावती,औरंगाबाद व नागपूर हे सहा प्रशासकीय विभाग पाडले आहेत.

त्याचप्रमाणे दिनांक 01 फेब्रुवारी 1965 पासून महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये वित्त व लेखा विषयक कामकाज करणारे राजपत्रित व अराजपत्रित पर्यवेक्षकीय अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा हा स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्यात आला. जेणेकरुन सदर संवर्गामध्ये कोषागारे व स्थानिक निधी व लेखा तसेच इतर कार्यालयामधून वित्त व लेखा विषयक कामकाजाची आवड असणारे कर्मचारी परीक्षा देवून नियुक्त होऊ शकतात. राज्यातील कोषागारेउपकोषागारेस्थानिक निधी व लेखा परीक्षा कार्यालयेजिल्हा परिषदांमधील वित्त विभागविविध महामंडळेराज्य शासनाच्या काही कार्यालयामध्ये वित्त व लेखा सेवेतील अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहून वित्तीय जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडीत आहेत. तसेच काही ठिकाणी वित्तीय सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

संचालनालयलेखा व कोषागारे आणि अधिनस्त कार्यालये ही वित्त विभागाच्या अखत्यारितील अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. या यंत्रणेंतर्गत सर्व विभागीय सहसंचालकजिल्हा कोषागार कार्यालयेउपकोषागारेतसेच अधिदान व लेखा कार्यालयमुंबईराज्य अभिलेख देखभाल अभिकरणव्हर्च्युअल ट्रेझरी यांचा समावेश आहे. अधिदान व लेखा कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालयतसेच उपकोषागारामार्फत शासनाच्या विविध विभागांमार्फत शासन खाती जमा होणाऱ्या तसेच विविध योजनांवर खर्च होणाऱ्या रकमांचा लेखा ठेवण्यात येतो. विभागीय सहसंचालकांमार्फत संबंधित विभागातील कोषागारांवर नियंत्रण ठेवण्याची व त्यांच्या आस्थापनाविषयक तसेच इतर दैनंदिन बाबी हाताळण्याचे काम केले जाते.

संचालनालयलेखा व कोषागारेमुंबई – IFMS अंतर्गत पुढील विविध संगणकीय प्रणाली कार्यरत आहेत. सेवार्थबील पोर्टलट्रेझरीनेट व्हर्जन 2, अर्थवाहिनीकोषवाहिनी, निवृत्तीवेतनवाहिनीअर्थसंकल्प अंदाजवितरण व संनियंत्रण प्रणाली (BEAMS), ग्रासवेतनिका.

बील पोर्टल : दुबार देयके सादर होण्याची शक्यता शून्य झालेली आहे. महालेखापालांचे अनुमतीनंतर ‘पेपर लेस बील‘ या संकल्पनेचा अंतर्भात करण्यात येणार आहे.

ट्रेझरीनेट व्हर्जन – 2 : प्रणालीमधील देयके/जमा/खर्चाची माहिती अर्थवाहिनी मार्फत कोषवाहिनी या संकेतस्थळावर सामान्य जनतेस/इतर शासकीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

अर्थवाहिनी : या प्रणाली मार्फत अंतर्गत अर्थसंकल्पीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येते.

कोषवाहिनी : देयकाची कोषागारामधील स्थिती जाणणे.

निवृत्तीवेतनवाहिनी : निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या निवृत्तीवेतन प्रदानाचा तपशिल निवृत्तीवेतन कॉर्नरवर त्वरीत उपलब्ध होतो.

अर्थसंकल्प अंदाजवितरण व संनियंत्रण प्रणाली (BEAMS) : शासन व्यवहारात पारदर्शकता

ग्रास : इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करून जनतेला कर व करेत्तर रकमा इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून शासकीय जमा लेखांकन पद्धतीने (ग्रास) या संकेतस्थळाद्वारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वेतनिका : वेतन पडताळणी पथकास प्राप्त होणारी सेवापुस्तके या प्रणालीमधून स्वीकारण्यात येतात. निवृत्त होणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांची माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना या प्रणालीवर उपलब्ध होते.

शासनाचे आर्थिक व्यवहार शासनाने विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन विविध योजना व विकास कार्यासाठी निधी प्रदान करण्याची महत्त्वपूर्ण कार्य कोषागार करीत असते. जवळ-जवळ 100 टक्के कोषागारांचे संगणकीकरण झालेले आहे. त्यामुळे जनतेला कोषागारांकडून तात्काळपारदर्शक व विनाविलंब सेवा पुरविण्यास कोषागार कार्यालये सक्षम झालेली आहेत. भविष्यातही कोषागार कार्यालये जनतेच्या सेवेसाठी सदैव तप्तर राहतील, यात शंका नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here