महिला क्रिकेटपटू मिताली राजवर चित्रपट

0

भारतीय महिला क्रिकेट ब्रिगेडच्या शिलेदाराचं आयुष्य लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मिताली राजवर बॉलिवूडपट काढण्याची घोषणा व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सने केली आहे. मितालीची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. धोनी, मिल्खा सिंग, सायना नेहवाल, मेरी कोम, खली यासारख्या क्रीडापटूंवर आतापर्यंत चित्रपट निघाले आहेत. लवकरच 1983 च्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे धोनी, कपिल देव यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिताली राजला मिळाला आहे. ‘माझ्या आयुष्यावर चित्रपट निघणार असल्याने मला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटातून अनेक तरुणींना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळेलअशी अपेक्षा मितालीने व्यक्त केली आहे. मिताली राज ही महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी क्रीडापटू ठरली आहे. वनडेमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी एकमेव महिला क्रिकेटर आहे. वनडेमध्ये सलग सातवेळा अर्धशतक करणारी पहिलीच क्रिकेटपटू आहे. 2005 आणि 2017 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचं नेतृत्व करणारी पहिली भारतीय आहे. मितालीला 2015 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे तिला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. कहानी, क्वीनपासून मेरी कोमपर्यंत महिला व्यक्तिरेखांना अधोरेखित करणाऱ्या अनेक चित्रपटांची निर्मिती व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here