पत्रकाराला शिवीगाळ, भाजपच्या पाशा पटेलांवर गुन्हा दाखल

0

पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे नेते पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार विष्णू बुरगे यांनी केलेल्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधाच आज पहाटे एफआयआर दाखल करण्यात आली.

लातूर : पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे नेते पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पत्रकार विष्णू बुरगे यांनी केलेल्या तक्रारीवरून पाशा पटेल यांच्याविरोधाच आज पहाटे एफआयआर दाखल करण्यात आली.

केवळ पेट्रोल दरवाढीवर एका पत्रकारानं प्रश्न विचारल्यानंतर संताप अनावर झालेल्या पाशा पटेल यांनी पत्रकाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली .लातूर विश्रामगृहात हा सगळा प्रकार घडला.

विशेष म्हणजे, ही घटना घडली त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकांत तुपकर यांच्यासह पत्रकार आणि काही शेतकरीही उपस्थित होते.

पेट्रोलची भाववाढ झाली, शहरात येण्यासाठीही शेतकरी आता विचार करेल, सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली का?’ असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर पाशा पटेल भडकले आणि शिवीगाळ केल्याचा दावा पत्रकाराने केला आहे.मला बसून प्रश्न वाचरतो का औकात आहे का, असं बोलत पाशा पटेल यांनी प्रचंड शिवीगाळ केली.

हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झालं आहे. पत्रकार विष्णू भुरगे यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. त्यानंतर पाशा पटेल यांच्यावर आज पहाटे गुन्हा नोंद करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here