सीपीआरमध्ये डॉक्टरांना मारहाण

0

कोल्हापूर : जयसिंगपूर येथील पायोस हॉस्पिटलमधील महात्मा फुले जनआरोग्य योजना बंद केल्यास कारणावरून सीपीआरमधील म. फुले जनआरोग्य योजनेच्या कार्यालयातील डॉक्टर सुभाष नांगरे (वय ५० रा. भादोले, ता. हातकणंगले) यांना मारहाण झाली. याप्रकरणी दोघाविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
डॉ. नांगरे यांनी आशिष रघुनाथ यादव, सचिन लोहार (रा. जवाहरनगर, इचलकरंजी) यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. जयसिंगपूर येथील पायोस हॉस्पिटलमधील जनआरोग्य योजना बंद झाली आहे. याबाबत निवेदन देण्यासाठी यादव, लोहार यांच्यासह ५० जण सीपीआरमध्ये आले. यावेळी यादव व लोहार यांनी ही योजना बंद केली म्हणून नांगरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तपास पोलीस निरीक्षक वसंत बाबर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here