जिल्हा पोलीस प्रमुख डॉ अभिनव देशमुख यांचं रामोशी समाजाच्या वतीने अभिनंदन

0

(नेसरी – प्रतिनिधी)

नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून बहिर्जी नाईक पुरस्कार ही अभिनव योजना सुरू करून छत्रपती शिवाजी महाराजानी जपलेले महान कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व हेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांना सन्मानित केल्यासारखच आहे. हा आनंद तमाम लढावया क्रांतिकारी रामोशी (बेरड बेडर तलवार) समाजाला झाला आहे. याबद्दल महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांना “प्रति शिवाजी राजे उमाजी” वसंतराव चव्हाण लिखित पुस्तक देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला. हा आदर्श राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी घेवुन महाराष्ट्र शासनाने या पुरस्काराची योजना राज्य पातळीवर सुरू करून गृहखात्यातील उच्चपदस्थांचा उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या पोलीस कर्मचाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करणेत यावे अशी मागणी राज्याध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी केली आहे.
यावेळी राज्य युवक नेते हर्षवर्धन चव्हाण जिल्हा युवक अध्यक्ष प्रशांत नाईक जिल्हा संपर्कप्रमुख मारुती नाईक जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विठ्ठल नाईक शिरोळ तालुका अध्यक्ष प्रकाश नाईक जिल्हा संघटक महागू नाईक तालुका संघटक मोहन चव्हाण आनंदा नाईक आदि. कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here