संगणक परिचालकांचे गुरुवारपासून उपोषण!!!

0

थकीत मानधन मिळावं या मागणीसाठी संगणक परीचालक येत्या 12 तारखेपासून आमरण उपोषण करणार आहेत या आंदोलन संबंधित एक बैठक आज जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात पार पडली. यावेळी तालुक्याचे अध्यक्ष संतोष कातुरे पाटील यांनी सर्व उपस्तित परिचालकांना १२ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणाऱ्या आमरण उपोषणाबद्दल माहिती दिली. ९ महिन्यांचे थकीत मानधन तसेच मानधनाबाबत असलेल्या टास्क कन्फेर्मशन हि जाचक अट इत्यादी मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तर १२ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरु करण्याचा निर्णय संगणक परिचालक समितीने केला आहे.
आज सकाळी ९ वाजता झालेल्या या बैठकीत गणेश झुंबड ता. उपाअध्यक्ष बदनापूर, उदयराज जोशी ता.सचिव बदनापूर व तालुक्यातील इतर सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here