शेतकरी नेत्यांनी आंदोलनापेक्षा सरकार बरोबर चर्चेसाठी पुढे यावे – सहकारमंत्री सुभाष देशमुख

0

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मध्ये शेतकरी हितासाठी बदल करण्यात येत आहेत.मात्र तथाकथिती शेतकरी नेत्यांनी आंदोलन करण्याऐवजी सरकार बरोबर चर्चा करण्याची भूमिका शेतकऱ्यांसाठी घ्यावी असे आवाहन करता पराचा कावळा करू नये असा टोला सहकार मंत्री सांगलीत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सुकाणू समितीतीच्या नेत्यांना लगावला आहे .ते आज असांगली मध्ये पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी देशमुख पुढे म्हणाले की, सरकार आंदोलनकर्त्या शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला कधीही तयार, त्यांनीही चर्चेसाठी पुढे यावे असे सांगत सरकारने शेतकरी आंदोलन सरकारने दडपल्याचा आरोप चुकीचा असल्याचा खुलासाही सुभाष देशमुख यांनी करीत रघुनाथ पाटील यांनी आंदोलनापेक्षा चर्चेस यावे असे आवाहन केले.कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज भरले पाहिजे .राज्यसरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट करत .राज्यातील गरजू शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे मोठ्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे मात्र राज्याच्या तिजोरीचा विचार या नेत्यांनि केले पाहिजे असे आवाहनहि यावेळी मंत्री देशमुख यांनी केले आहे .तसेच सदाभाऊ खोतांबाबत स्वाभिमानीचा सरकारवर कसलाही दबाव नाही असे स्पष्ट करीत आमचे सरकार व्यवस्थित सुरू आहे असा दावाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगलीत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here