फराकटेवाडी ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

0

कागल (विष्णूपंत इंगवले) :

कागल तालुक्यातील फराकटेवाडी ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. आयएसओ मानांकन मिळवणारी तालुक्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याची माहिती, सरपंच सौ. शीतल रोहित फराकटे यांनी दिली.

कागल तालुक्याच्या पश्चिमेकडील फराकटेवाडी हे १२०० लोकसंख्येचे गाव आहे. गावच्या ग्रामस्थांनी एकजुटीने काम करत आजअखेर शासनाच्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी गावात केली आहे. म्हणूनच ग्रामपंचायतीसह अंगणवाडी, प्राथमिक शाळा यांना तालुका व जिल्हा स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत.

महाराष्ट्र शासन व कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने २०१७ – १८ साली घेण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासह अंगणवाडीला उत्कृष्ट अंगणवाडी, प्राथमिक शाळेला स्वच्छ व सुंदर शाळा असे पुरस्कार मिळाले आहेत.

यावेळी आयएसओ मानांकन मिळाल्याने ग्रामपंचायतीच्या यशोलौकिकात भर पडल्याचे सरपंच सौ. शीतल फराकटे यांनी सांगितले. याकामी आ. हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, माजी सरपंच बाळासाहेब फराकटे यांचे सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच भारती फराकटे, विठ्ठल फराकटे, मानसिंग फराकटे, श्रीमाबाई फराकटे, तेजस्वीनी फराकटे, कोमल फराकटे, अश्विनी फराकटे, ग्रामसेवक एस. वाय. कांबळे, बाळकृष्ण फराकटे, आनंदा फराकटे, केरबा फराकटे, सुनिल फराकटे, संतोष फराकटे, तानाजी फराकटे, मोहन फराकटे बाबूराव फराकटे, नामदेव फराकटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here