ऑनलाईन कामावरील बहिष्कारातून वेतन प्रणालीचे काम वगळले

शिक्षणाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीत जिल्हा शिक्षक समन्वय समितीची निर्णय

0

महेश गोडगे

सोलापूर (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षकांचे पगारीमुळे कुचंबना होऊ नये, सर्वांचे पगार वेळेत व्हावेत यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी संघटनांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटरच्या मदतीने शालार्थ वेतन प्रणालीचे काम करण्याचे आवाहन केल्याने शालार्थ वेतन प्रणालीचे कामकाज वगळून ऑनलाईन कामावरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय आज शिक्षणाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या जिल्हा शिक्षक समन्वय संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

                यावेळी ऑनलाईन कामांवरील बहिष्कार, शिक्षकांचा पगार १ तारखेला करावा, शालेय पोषण आहार अनुदान वाटप करणे, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी पदोन्नती देणे, २५ % विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देणे, मागासवर्गीय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती रक्कम वितरण करणे, २२/१० रोजी १२ वर्षे, २४ पूर्ण झालेल्यांना चट्टोपाध्याय वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी देणे, व डी. सी. पी. एस. रक्कम कपात थांबवणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

               या बैठकीत मुख्याध्यापकांनी  गटशिक्षणाधिकारी कार्यालयात डाटा एंट्री ऑपरेटरच्या सहकार्याने शालार्थ वेतन प्रणाली भरण्याविषयी सर्वांचे एकमत झाले असून जानेवारी अखेर पर्यंत मुख्याध्यापक पदोन्नती व २५% विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्याचे, तसेच उर्वरित २२/१० रोजी १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना चट्टोपाध्याय वेतन श्रेणीचा देण्याचा प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी यांचेकडून मागववणार असल्याचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस शिवानंद भरले, मच्छिंद्रनाथ मोरे, अनिल कादे, सुधीर कांबळे, राजाराम चव्हाण, नवनाथ धांडोरे, विद्याधर भालशंकर, इकबाल नदाफ, अरूण नागणे, विजय देशमुख, सुर्यकांत हत्तूरे- डोगे, राम बिराजदार, सिद्राम कटगेरी, किरण सगेल, अमोगसिद्ध कोरे आदि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here