क्षयरोग निर्मूलनाकरिता सर्वांचा सहभाग आवश्यक – सदाभाऊ खोत

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन

0

सांगली : क्षयरोग ही सार्वजनिक आरोग्याची महत्त्वाची समस्या आहे. देशात दरवर्षी 29 लाख नवीन क्षयरूग्ण सापडतात. त्यापैकी 4 लाख 20 हजार क्षयरोगी दरवर्षी दगावतात. तसेच, यातून दरवर्षी 20 हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे क्षयरोगाचे नियंत्रण करण्यासाठी लवकरात लवकर निदान आणि संपूर्ण औषधोपचाराची आवश्यकता आहे. क्षयरोग निर्मूलनाकरिता सर्वांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन सदाभाऊ खोत यांनी केले.

खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व औषध विक्रेते यांचा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात सहभाग वाढविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, सांगली जिल्ह्यात सीमाभागातील रूग्ण तपासणीसाठी येतात. त्यामुळे सांगली जिल्ह्यात आढळलेल्या क्षयरोग रूग्णांमध्ये सीमाभागातील रूग्णांचाही समावेश असू शकतो. त्या छुप्या रूग्णांचा शोध घेणे गरजेचे आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी व इतरांना त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांनी क्षयरूग्णांची माहिती द्यावी, असे त्यांनी सूचित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here