रिपब्लिकन पक्षात बाल आघाडी ची स्थापना

0

कुमार जीत आठवले यांची रिपाइं च्या बाल आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए) च्या बाल आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री ना .रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जीत आठवले यांची आज अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. चेंबूर नाका येथे एका कार्यक्रमात कुमार जीत आठवले यांचा ना रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी कु जीत आठवले यांच्या हस्ते रिपाइंच्या बाल आघाडी चेंबूर तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची निवड करण्यात आली . सर्वचं पक्षान्मध्ये युवक , युवती , ओबीसी , अनुसूचित जाती जमाती या आघाड्या कार्यरत आहेत .रिपाइंने बाल आघाडी स्थापन करुनलहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू देण्याची सुरवात केली आहे . या बाल आघाडीमुळे रिपाइंत अनेकांना काम करण्याची संधी मिळणार आहे . जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे अभयाताई सोनवणे शकुंतलाताई आठवले तसेच रवी गायकवाड संजय डोळसे हेमंत रणपिसे सुनील शिरसाट प्रभावती रणदिवे अशोक घोक्षे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here