प्रजासत्ताक दिनी भाजपाच्या तिरंगा एकता यात्रा- रावसाहेब दानवे

राज्यभर तिरंगा एकता यात्रा काढणार

0

मुंबई- वेगवेगळ्या झेंड्यांखाली विविध समुदायांना एकवटून समाजात दुफळी माजविण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून होत असतानाच तिरंग्याखाली सर्वांना एकत्र आणून सामाजिक सलोखा व ऐक्याचा संदेश देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते 26 जानेवारी रोजी राज्यभर तिरंगा एकता यात्रा काढणार आहेत, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पाटील दानवे यांनी बुधवारी सांगितले. मुंबईतील तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होतील.

खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, भाजपासाठी सामाजिक समता सर्वात महत्त्वाची असून संविधान हाच धर्म आहे. तिरंगा यात्रेच्या निमित्ताने गावागावात भाजपाचा हा विचार पोहचविण्यात येईल. राज्यभरात तीनशे ठिकाणी या यात्रा काढण्यात येतील. भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते यात्रांसाठी पुढाकार घेतील. या बाईक रॅली असतील. पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व इतर सर्व लोकप्रतिनिधी यात्रांमध्ये. सक्रिय सहभागी होतील असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here