आजवर आठ मुख्यमंत्री पाहिले, आत्ताच आरोप कसे?; एकनाथ खडसेंचा सवाल

0

जीवनगौरव पुरस्कार मिळणं म्हणजे करियर संपले असे नाही तर ती कामाची पोचपावती आहे. मात्र, काहींना असे वाटत असले तरी आता खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली असून आता शून्यातून विश्व निर्माण करेन,” असे विधान माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी पुण्यात केले. मात्र, या सूचक विधानामुळे त्यांनी आगामी काळात महाराष्ट्रात काही राजकीय घडोमोडी घडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या संस्थेतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना प्रदान करण्यात आला. दरम्यान, पुरस्काराला उत्तर देताना खडसे म्हणाले, माझ्या राजकीय कारकिर्दीत मी आजवर ८ मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्यांच्याकाळात माझ्याविरोधात कधी काही घडले नाही. मात्र, आत्ताच एक वर्षापासून काय मागे लागले आहे. या सर्व आरोपांतून मी निर्दोष बाहेर आलो असून अजून किती आरोप माझ्यावर होत आहेत याचीच वाट पाहतोय. त्यामुळे कोणाला किती ओरडायचेय ते ओरडू द्या. मी प्रमाणिकपणे काम करीत आहे आणि यापुढेही करीत राहणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here