शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याबाबत गडहिंग्लज सिध्देश्वर महिला ग्रुपचे मुख्यमंत्रीना निवेदन

0

गडहिंग्लज : अमरावती येथील एका महाविद्यालयातील कार्यक्रमात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत त्यांना तातडीने राजीनामा देण्यात यावा ह्यासाठी गडहिंग्लज सिध्देश्वर महिला ग्रुपच्या वतीने प्रांत अधिकारी यांचे शिरस्तेधार महादेव मुत्तनाळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा जोतिबा फुले, छ. राजर्षी शाहू महाराज यांनी मोफत व सक्तीचा कायदा केला आहे. त्यामुळे राज्यातील गरीब मुलामुलींना शिक्षण घेता आले पण शिक्षण मंत्री विनोद तावडे हे अमरावती येथील एका महाविद्यालयातील कार्यक्रमासाठी गेले असता गरीब विद्यार्थाना मोफत शिक्षण देणार का ? याबाबत विचारणा केल्यानंतर शिक्षणमंत्री यांनी शिक्षण जमत नसेल तर सोडून टाका असे म्हणून त्या विद्यार्थ्यांवर अटकेची कारवाई करून महाराष्ट्र राज्यात महात्मा जोतिबा फुले व छ. राजर्षी शाहू महाराज यांच्या शिक्षणाबाबत असलेला विचार मोडून काढण्याचा प्रयत्न शिक्षण मंत्री यांनी केला. तरी आम्ही गडहिंग्लज सिध्देश्वर महिला ग्रुप, गडहिंग्लज यांच्या वतीने निषेध व्यक्त करून गडहिंग्लज प्रांत अधिकारी यांच्यामार्फत आपलेकडे मागणी करीत आहोत की, त्वरित शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घ्यावा व तसे न झाल्यास आठ दिवसानंतर गडहिंग्लज प्रांत कार्यालयाजवळ तीव्र आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शोभा जिंदगी, रूपा सोलापूर, सोनाली गंधवाले, महादेवी कमते, भरती सोलापूर, शिवसेनेचे काशिनाथ गडकरी, अमित कोरी, निकेतन चव्हाण, नितीन सुतार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here