रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असताना गँसपाईप लाइन फुटल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण

डहाणू तालुक्यातील बोर्डी अस्वाली मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरु असताना घडली घटना

0

प्रतिनिधी- योगेश चांदकर

डहाणू- डहाणू तालुक्यातील बोर्डी अस्वाली मार्गाचे रुंदीकरणाचे काम करण्यासाठी खोदकाम करताना भुमिगत घरगुती गँसपाईप लाइन फुटल्याने गँस गळती सुरू झाली होती. हि घटना दुपारी एक वाजता घडली असून यामुळे स्थानिक जनतेत भीतीचे वातावरण पसरले होते.

या घटनेबद्दल गुजरात गँस कंपनीचे विभागीयअधिकारी रवींद्र यादव यांना माहिती दिल्यानंतर उंबरगाव येथून गँस पाईपलाईन बंद करण्यासाठी कर्मचारी रवाना झाले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान आता दुरुस्ती सुरु असून, पूर्ण लाइन बंद करण्यात आली आहे दुरुस्तीचे काम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here