डॉ. घाळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत साताऱ्याचा किरण किर्तीकर प्रथम , काव्यवाचनात कोल्हापूरचा बोकमूरकर आकाश तर उत्स्फुर्त वक्तृत्व मध्ये शिंदे प्रविण प्रथम.

0

 

-प्रा. शिवाजी पाटील-

विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. एस.एस. घाळी यांच्या 29 व्या स्मृतीदिननिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लालबहादूर शास्त्री महाविद्यालय साताऱ्याच्या कु. किरण संजय किर्तीकर याने प्रथम क्रमांकाचे रोख 7000/- रूपयाचे पारितोषिक , सन्मान चिन्ह व सन्मानपत्र पटकाविले. तर काव्यवाचन स्पर्धेत बोकमुरकर आकाश यल्लाप्पा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर याने प्रथम क्रमांकाचे 2001/- रूपयाचे पारितोषिक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र पटकाविले तसेच उत्स्फुर्त वत्कृत्व स्पर्धेत शिंदे प्रविण अशोक , टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे याने प्रथम क्रमांकाचे 501/- रूपयाचे पारितोषिक, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र पटकाविले.

 स्पर्धेचा सविस्तर निकाल असा.

पूर्वतयारी वक्तृत्व स्पर्धा

द्वितीय क्रमांक      ः- रिडलाॅज भरत अर्जुनसिंग – जयप्रकाश नारायण कॉलेज, औरंगाबाद-रोख रूपये 5 हजार व सन्मान चिन्ह.

तृतीय क्रमांक       ः- कोडोलिकर पूर्वा प्रसाद  – संजय घोडावत विद्यापीठ (आळते) कोल्हापूर – रोख रूपये 4 हजार व सन्मान चिन्ह.

चतुर्थ क्रमांक ः- ठाकरे प्रशांत गजानन – शिवाजी कॉलेज, अकोला – रोख रूपये 3 हजार व सन्मान चिन्ह.

पाचवा क्रमांक       ः- नगरकर निखिल सुभाश – न्यू आर्टस्,कॉमर्स,सायन्स कॉलेज, अह.नगर- रोख रूपये 2 हजार व सन्मान चिन्ह.

सहावा क्रमांक       ः- भद्रे ऐश्वर्या संजीव – रामनारायण रूईया कॉलेज, माटुंगा (मुंबई) – रोख रूपये 1 हजार व सन्मान चिन्ह.

काव्यवाचन स्पर्धा

द्वितीय क्रमांक      ः-  काळंगे सुमित श्रीमंत – छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा – रोख रूपये 1001  व सन्मान चिन्ह.

तृतीय क्रमांक       ः- इंगोले स्वप्नील राजेष – डी. वाय. पाटील कॉलेज, आकुर्डी – पुणे – रोख रूपये 701 व सन्मान चिन्ह.

चतुर्थ क्रमांक ः- भोईटे कुणाल विक्रांत – ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे – रोख रूपये 501 व सन्मान चिन्ह.

पाचवा क्रमांक       ः- भद्रे ऐश्वर्या संजीव – रामनारायण रूईया कॉलेज, माटुंगा (मुंबई) – रोख रूपये 301 व सन्मान चिन्ह.

सहावा क्रमांक       ः- गवस राहूल गोविंद – महावीर महाविद्यालय, कोल्हापूर – रोख रूपये 201 व सन्मान चिन्ह.

उत्स्फुर्त वक्तृत्व स्पर्धा

द्वितीय क्रमांक      ः- शिरतोडे विक्रम मारूती – सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड –  रोख रूपये 301  व सन्मान चिन्ह.

तृतीय क्रमांक       ः- कांबळे वैभव बळवंत – शिवाजी  विद्यापीठ कोल्हापूर –  रोख रूपये 201 व सन्मान चिन्ह.

चतुर्थ क्रमांक ः- धायगुडे प्रियांका गोपीनाथ –रदचंद्र महाविद्यालय, लोणंद – रोख रूपये 101 व सन्मान चिन्ह.

पाचवा क्रमांक       ः- लांडगे सत्यजीत पंडित – इंडियन लॉ सोसायटी, विधी महाविद्यालय, पुणे-  रोख रूपये 101 व सन्मान चिन्ह.

सहावा क्रमांक       ः- भद्रे ऐष्वर्या संजीव – रामनारायण रूईया कॉलेज, माटुंगा (मुंबई) – रोख रूपये 101 व सन्मान चिन्ह.

 मा. आमदार हसन मुश्रीफसाो व सामाजिक कार्यकर्ते मा. गंगाधर व्हसकोटीसाो यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती रत्नमाला घाळीवहिनीसाो होत्या. सदर स्पर्धेचा  पारितोषिक वितरण समारंभ जि. प. कोल्हापूरच्या सदस्या मा. अनिता चौगुले पाटील व प. स. गडहिंग्लजच्या सभापती मा. सौ. जयश्री तेली  यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. मा. अनिता चैगुले पाटील व मा. सौ. जयश्री तेली यांनी सदर स्पर्धेच्या पारितोषिकासाठी प्रत्येकी दहा हजार रूपयाची भरीव देणगी दिली.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मा. डॉ. सतीश घाळाीसाो होते. उपाध्यक्ष मा. अरविंदआण्णा कित्तुरकर, सचिव अॅड. मा. बाबुराव भोसकी, सहसचिव मा. गजेंद्र बंदी, संचालक इंजि. मा. किशोर हंजी, मा. महेश घाळी, मा. डॉ. शिवकुमार कोल्हापूरे, मा. प्राचार्य डाॅ. मंगलकुमार पाटील, संस्थेचे सी.ई.ओ. मा. आय. जी. फुटाणे, मा. के. आय. षेट्टी, रावसाहेब कित्तुकरआण्णा ज्युनिअर काॅलेजचे प्राचार्य मा. सी एस मठपती, एस. डी. हायस्कूल, मुत्नाळचे मुख्याध्यापक मा. श्रीरंग तांबे, तसेच मान्यवर उपस्थित होते, तसेच एस.एस.एन आर्टस्,

कॉमर्स  कॉलेज हुक्केरीचे चेअरमन मा. आर. एस. शेट्टी, प्राचार्य डॉ. एस. एस. गवते, तसचे कार्यालयीन अधिक्षक श्री. बी. एस. पाटील उपस्थित होते.

      स्पर्धेत औरंगाबाद, गोंदिया, अकोला, बारामती, लोणंद, बीड, गेवराई, जळगांव, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, चिपळूण, सांगली, मुंबई, रत्नागिरी, अमळनेर, अक्कलकोट,सातारा, लातूर, कऱ्हाड, पुणे, कोल्हापूर इत्यादी ठिकाणच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धा प्रकारात 150 विद्याथ्र्यांनी सहभाग घेवून आपली वक्तृत्व व काव्यवाचन कला सादर केली. प्रा. सौ. एस. ए. आरबोळे यांनी स्वागत केले. प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. पी. आर. बिराजदार, प्रा.सौ. डॉ. सरोज बिडकर यांनी निकाल पत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी कु. प्रणाली काळे, कु. आरती भालेकर, कु. रामकुमार सुर्वे, कु. संजय षिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शिवाजीराव भुकेले, सदस्य प्रा. पी. आर. बिराजदार, डॉ. नागेष मासाळ, प्रा. सौ. सरला आरबोळे, प्रा. सौ. राजश्री पोरे, डॉ. एस. ए. मस्ती, प्रा. सचिन जानवेकर, प्रा. महेश कदम, सांस्कृतिक विभागातील सर्व विद्यार्थी – विद्यार्थीनींनी केले. परिक्षक म्हणून ए.बी.पी. माझाचे पत्रकार मनश्री पाठक, कथाकथनकार मनिशा सुर्वेबी न्यूज चे पत्रकार प्रा. शिवाजी पाटीलप्रा. डॉ. विनोद कांबळे, मा. लता ऐवाळे, मा. सुभाश कोरे, मा. सुरेश वडराळे, प्रा.आशपाक मकानदार यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागातील प्राध्यापिक व प्राध्यापिका, कार्यालय अधिक्षक , तसेच प्रशासकीय कर्मचारी, परिचर यांनी मोलाचे सहकार्य केले. आभार प्रा. डॉ. मासाळ एन. बी. यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here