खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ डॉ.नंदीनी बाभुळकरांचा तब्बल १३३ गावांत संपर्कदौरा

0

 

गडहिंग्लज : खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी युवा नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी अक्षरश: आपल्या पायाला भिंगरी बांधली आहे. १५ दिवसांत तब्बल १३३ गावांचा संपर्क दौरा त्यांनी
पूर्ण केला. मोदी सरकारच्या कामगिरीवर जोरदार हल्लाबोल करीत लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला विजयी करण्याचे आवाहन त्या करीत आहेत.
गेल्या पाच वर्षांत संपूर्ण देशात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दलित, अल्पसंख्याक व महिलांवरील वाढते अत्याचार, गगनाला भिडलेली महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी व ‘जीएसटी’मुळे व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकांची झालेली आर्थिक कोंडी या मुद्द्यांवरच त्यांनी प्रचारात भर दिला आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथून त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील वाड्या-वस्त्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह संपर्कदौरा सुरू आहे. दरम्यान, कानडेवाडी, किणे, बसर्गे व पाटणे फाटा येथे त्यांनी प्रचारसभाही घेतल्या. आठवडाभरात दौरा पूर्ण करून जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय मेळावे घेण्याचे नियोजन केल्याचे सांगण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here