कल्लाप्पाण्णा आवाडे यांना डॉ घाळी समाजभूषण पुरस्कार

0

प्रा.शिवाजी पाटील

डॉ घाळी प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या डॉ घाळी समाजभूषण पुरस्कारासाठी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण २४ ऑगस्ट ला रोजी होणार आहे. सहकार उद्योग शिक्षण, समाजसेवा, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार प्रतिष्ठानमार्फत दिला जातो. रोख २५ हजार रुपये व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. साम टीव्ही. चे संपादक श्री संजय आवटे यांचे ‘वारसा आणि आरसा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती रत्नमाला घाळी वाहिनी असतील .

डॉ घाळी यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त २२ ऑगस्ट पासून विवध कार्यक्रम होणार आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राज्यस्तरीय वक्त्तृत्व स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. २३ ऑगस्टला पंचायत समिती सौ जयश्री तेली व जिल्हा परिषद सदस्या सौ अनिता चौगुले पाटीलयांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. तर २४ ऑगस्ट ला सकाळी सदभावना दौड आणि भव्य मॅरेथोन स्पर्धा होणार आहेत. या मध्ये पोलीसासाठी खास मॅरेथोन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता पुरस्काराचे वितरण होईल  अशी माहिती विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ सतीश घाळी यांनी दिली .यावेळी श्री अरविंदआण्णा कितुरकर, डॉ शिवकुमार कोल्हापूरे, डॉ मंगलकुमार पाटील, के आय शेट्टी,  उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here