चंदगडमधील मेळाव्यात कार्यकर्त्यांशी डॉ. व्हासकोटी यांचा संवाद

0

चंदगड : समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी मी माझे कार्यक्षेत्र विस्तारित केले असून, संपूर्ण चंदगड विधानसभा मतदारसंघ डोळ्यापुढे ठेवून कार्यरत असल्याची माहिती डॉ. गंगाधर व्हासकोटी यांनी दिली. येथे त्यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन संवाद साधला.
तालुक्याच्या विविध भागातून कार्यकर्ते उपस्थित होते.व्हासकोटी म्हणाले, “गेली सुमारे तीस वर्षे मी सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्याची दखल घेऊन मान्यताप्राप्त विद्यापीठांनी मला डॉक्टरेट पदवी दिली. यापुढील काळात शेतीच्या विकास कामाला महत्व देऊन कामाचे नियोजन करणार आहे. त्याशिवाय रस्ते,पिण्याचे पाणी,शेतीचे पाणी, विधवा, परित्यकता महिला, वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कार्यकर्त्यांनी या कामात सहकार्य करावे.”
मेळाव्यात जयंत देसाई-आडकुरकर,रक्तनकांत गावडे,मारुती जांबरेकर,शंकर चव्हाण,खेमाजी दळवी, आर.पी. कांबळे,गणपती शिंदे,रवी रेडेकर, प्रकाश चीगरे,नारायण गुडुळकर, रामचंद्र मोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here