फक्त प्रसिद्धीसाठी शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये : संग्रामसिंह कुपेकर

0

 

आजरा ( प्रतिनिधी ) : आजरा तालुक्यातील रखडलेल्या उंचीगी प्रकल्पा संदर्भात सौ. नंदिनी बाभुळकर यांनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांना दिलेले व प्रसिद् झालेल्या निवेदनच्या अनुषंगाने शिवसेनेचे संघटक – (चंदगड विधासभा मतदार संघ) संग्रामसिंह कुपेकर यांनी टीका करताना म्हटले आहे की ज्यांना उचंगी प्रकल्प कुठे आहे हे माहीत नाही त्यांनी फोटो काढून श्रेयवादीचे राजकारण करू नये.

सदर पत्रकात म्हटले आहे. उंचीगी प्रकल्पाच्या संदर्भात कृष्णा, गोदावरी, घटप्रभा, लवादा प्रकल्पा अंतर्गत कृण्णा खोरेच्या माध्यमातून गडहिंग्लज उपविभागाकरिता ७ टी. एम. सी. पाणी अडविण्याची मान्यता केंद्रिय जल अयोगाच्या समितीने दिलेली आहे. त्या अनुषंगाने १९९५ साली शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला पहिली शासकीय मान्यता देण्यात आली होती. काम सुरु होऊन ८०% प्रकल्प पुर्ण झालेला आहे. चाफवडे, उंचगी, श्रृंगारवाडी, जेऊर येथील प्रलल्प ग्रस्तांचे पुनर्वसन न झालेमुळे हा प्रलल्प मागील २३ वर्ष रखडलेला असून या संदर्भात मे २०१० साली स्वर्गीय बाबसाहेब कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प पुर्ण व्हावा म्हणून प्रकल्पग्रस्त व लाभधारक यांच्या समवेत आम्ही भर उन्हात हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मा. जिल्हाअधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवने यांच्या समवेत उचंगी प्रकल्पासंदर्भात तहसिल कार्यालय आजरा येथे अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त यांच्या सोबत बैठका घेऊन याबाबत काही प्रश्न मार्गी लावले आहेत.

दि. ५/०२/२०१९ रोजी घळभरणीचा कार्यक्रम प्रशासनाच्या वतीने ठरविण्यात आला होता. त्यावेळी सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. परंतु प्रकल्प ग्रस्तांच्या अटी व मागण्या पुर्ण न झाल्यामुळे घळभरणी कार्यक्रम पुढे ढकलुन याबाबत दि. ८ / ०२ / २०१० रोजी विठ्ठल मंदिर चाफवडे येथे बैठक बोलवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. त्या बैठकिला शिवसेनेच्या पुढाकाराने समजुत काढुन प्रकल्पग्रस्ताकडुन मान्यता घेतली होती. दि. ८/०२/२०१९ रोजी झालेल्या बैठकीस जिल्हाप्रमुख विजय देवने, आम. संध्यादेवी कुपेकर, अप्पर जिल्हा अधिकारी नंदकुमार काटकर, कार्यकारी अभियंता स्मिता माने, उप. विभागीय अधिकारी संपत खिल्लारी, तहसिलदार अनिता देशमुख, प्रा. सुनिल शिंत्रे, प्रभाकर खांडेकर, प्रकल्प ग्रस्ताचे नेते संजय तर्डेकर व सर्व प्रमुख मंडळी व चारही गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व मी स्वता उपस्थित होतो.

मागील बैठकित अप्पर जिल्हाआधिकारी काटकर यांनी १९९५ साली जी संकलन यादी तयार करण्यात आली. त्यापैकी १७ प्रस्तावना दुरुस्ती करुन मान्यता देण्यात आली. व शिल्लक राहीलेल्या १९ प्रस्तावाना १५ दिवसात मान्यता देण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. तसेच दोन मीटर उंची वाढवण्याच्या विषयाला प्रकल्प ग्रस्तांचा तीव्र विरोध होता. परंतु प्रशासनाने सांडव्याची उंची कमी करण्याचा आजच्या बैठकिचा ठराव व प्रस्ताव तयार करण्याचे ठरले व तसे आदेश अप्पर जिल्हाअधिकारी काटकर यांनी प्रशासनाला दिले.

आणि ह्या जिव्हाळ्याचा प्रश्नासंदर्भात आमच्या ताईसाहेब सौ. नंदाताई बाभुळकर ह्या फक्त प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्री सोबत फोटो काढून खोटे श्रेय घेत आहेत. पहिला त्यांना हे तरी माहीत आहे काय की उचंगी प्रकल्प कुठे आहे? प्रकल्प ग्रस्तांचा समस्या ऐकुन न घेता सवंग प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्री यांना भेटुन फोटो काढुन पत्रकास प्रसिद्धीधीस देणे हि तर प्रकल्प ग्रस्त व शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे उचंगी प्रकल्प हा लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी सर्व पक्षीय पदधिकार्यांनी सहकार्य करावे व आमच्या ताई साहेबांनी श्रेयवादाचे  राजकारण करु नये असे शिवसेनेचे संघटक संग्रामसिंह कुपेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here