“मोदी मुर्दाबाद नको, प्रेमाने लोकसभा जिंकू”- राहुल गांधी

0

काँग्रेस पक्षाचा प्रेम आणि स्नेहभावावर विश्वास आहे’.त्यामुळे मुर्दाबाद हा शब्द कॉग्रेस पक्ष वापरत नाही. असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.
ओडिशामधील मधील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख करताच उपस्थितांमधील काहीजणांनी नरेंद्र मोदी मुर्दाबाद घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी पक्ष कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. ते म्हणाले ‘मोदी जिथे पाहतात तिथे राफेल, शेतकरी, कामगार आणि महिला दिसतात. नरेंद्र मोदी सगळ्या बाजूने घेरले गेले आहेत. यामुळे त्यांचा चेहरा, स्वभाव आणि हावभाव बदलले आहेत. आपल्याला प्रेम आणि स्नेहभावाने भाजपाविरोधात विजय मिळवायचा असल्याचं पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. काँग्रेस प्रेम आणि स्नेहभावासाठी ओळखली जाते असंहि ते म्हणाले.
राहुल गांधी यांनी द्वेष व्यक्त करणारा एकही शब्द न वापरता काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here