वॉशिंग्टन – एका महिलेने आपल्या घटस्फोटासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलं आहे. फ्लोरिडा मधील पाम बीच काऊंटी येथे राहणा-या लिन आणि डेव्ह अॅरॉनबर्ग यांचा गेल्याच आठवड्यात घटस्फोट झाला आहे. लिन एक चिअरलिडर राहिली असून, तिचा पती डेव्ह अॅरॉनबर्ग एक प्रतिष्ठित वकिल आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सेल्फी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे, तसंच रिपब्लिकन पक्षाशी संबंधित मुद्द्याचं समर्थन केल्याने आपला घटस्फोट झाल्याचा दावा लिन यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम यांचं समर्थन करणं. यामुळे त्यांचा हा घटस्फोट आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. ‘मी रिपब्लिकन पक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कट्टर समर्थक आहे. यामुळे आमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या येत असल्याचं माझ्या लक्षात आलं’, असं लिन यांनी सांगितलं. वॉशिंग्टन पोस्टशी लिन यांनी यासंबंधी बातचीत केली. त्यांनी सांगितलं की, हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील लढाई सुरु झाली तेव्हा मात्र परिस्थिती बदलली. हिलरी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील तणाव जसजसा वाढत गेला, तसतसा आमच्या नात्यातील तणावही जाणवू लागला’.

स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डेव्ह यांना अनेकदा ट्रम्प यांच्या क्लबमध्ये पाहिलं गेलं आहे. डेव्ह यांना डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळेल असा अंदाजही वर्तवण्यात येत होता’. मी त्यांच्यासोबत सेल्फीही काढायची. माझे पती मात्र मी फोटो काढू नये, तसंच ते सोशल मीडियावर अपलोड करु नये असं सांगायचे. मात्र मी कधी त्यांचं ऐकलं नाही’, असं लिन यांनी सांगितलं आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here