“दौलत” चालवण्यास देण्याचा मार्ग मोकळा

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना भाड्याने देण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेणाऱ्या न्यूट्रियन्टस् अॅग्रो फ्रुट्स कंपनीचा दावा दिवाणी कोर्टाच्या प्रमुख न्यायाधीशांनी फेटाळला. त्यामुळे कारखाना भाड्याने देण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

जिल्हा बँकेने दौलत कारखाना न्यूट्रियन्टस् कंपनीला ४५ वर्षे मुदतीने भाडेतत्वावर चालवण्यास दिला होता. कंपनीने करारानुसार ५० टक्के रक्कम भरली. उर्वरीत रक्कम पाच हप्त्यांत भरण्याचा करार होता. कंपनीने २५ मार्च २०१८ रोजी पहिला हप्ता न भरल्याने बँकेने कंपनीसोबतचा करार रद्द केला. बँकेच्या निर्णयाविरोधात कंपनीने जिल्हा दिवाणी कोर्टात दावा दाखल केला. कोर्टाने बँकेला पहिल्या हप्त्याची रक्कम भरण्यास एक महिन्याची मुदत दिली होती. पण मुदतीत रक्कम न दिल्याने कंपनीशी झालेला करार रद्द केला. त्यावर कंपनीने पुन्हा कोर्टात अर्ज दाखल केल्यावर तो नाकारण्यात आला. बँकेने २१ डिसेंबर २०१८ रोजी कारखाना ताब्यात घेऊन ४ जानेवारी २०१९ रोजी कारखाना भाड्याने देण्याची प्रक्रिया सुरू केली. बँकेने कारखाना भाड्याने देण्यासाठी निविदा जाहीरात प्रसिद्ध केली. त्याला कंपनीने पुन्हा जिल्हा कोर्टात अर्ज दाखल केला. या दाव्यावर सुनावणी होऊन न्यूट्रियन्टस् कंपनीचा दावा फेटाळण्यात आला. कोर्टाच्या निर्णयामुळे कारखाना भाड्याने देण्याच्या निविदेवर निर्णय घेण्यातील अडथळा दूर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here