वाशिम शहरात दुषित पाणी पुरवठा

दुषित पाण्याने नागरिक हैरान

0

वाशिम शहरात अनेक ठिकाणी दुषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरीकांना दुर्गधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे. दुषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या प्रकृतीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

यंदा या भागात पाऊस कमी प्रमाणात पडला होता. त्यामुळे पाण्याची सरासरी पातळी घसरली आणि  एकबुर्जी जलाशयात पाण्याची पातळी कमी झाली आहे.

सद्य परिस्थितीत नागरीकांना आठ ते दहा दिवसातून पाणीपुरवठा केला जातोय. पाणी मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने नागरीकांना पाणी साठवून ठेवण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच दुषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाईपलाईन बदलल्या नसल्याने त्याला गंज लागला आहे. शहरात भुयारी गटाराचे कामसुध्दा सुरु आहे. त्या कामावेळी पाण्याच्या पाईप फुटल्यानेसुद्दा पाणी दुषित होत आहे.

नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने नागरीकांच्या आरोग्याशी न खेळता स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी वाशिमकरांनी केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here