विद्यापीठाकडून एसआरपीडीबाबत बुधवारपासून जिल्हानिहाय कार्यशाळा

0

विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांना 4 ऑक्टोबर पासून प्रारंभ हो आहे. या सत्रामधील (ऑक्टोबर/नोव्हेंबर/डिसेंबर 2017) विविध तेरा अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे 128 केंद्रामधून एसआरपीडी प्रणालीद्वारे म्हणजेच ई-मोडद्वारे वितरण करण्याचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्शनासाठी येत्या बुधवारपासून (दि. १३) विद्यापीठामार्फत प्राचार्यांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. ही माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली आहे.

श्री. काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरपीडी (सिक्युअर्ड रिमोट पेपर डिस्ट्रीब्युशन) प्रणालीच्या सॉफ्टवेअरबाबतची सविस्तर माहिती देण्यासाठी महाविद्यालयांचे प्राचार्य संगणकावर काम करणारे तज्ज्ञ कर्मचारी यांच्यासाठी एकत्रित जिल्हानिहाय कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात बुधवारी (दि.13) सकाळी 10 वाजता, सांगलीच्या मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात बुधवारी (दि.13) दुपारी 3 वाजता आणि साताऱ्याच्या के.बी.पी.कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे गुरुवारी (दि.14) सकाळी 10 वाजता कार्यशाळा होणार आहेत.

दरम्यान, अग्रवाल समितीच्या शासनमान्य शिफारशीनुसार ई-मोडद्वारे (एसआरपीडी) प्रश्नपत्रिका वितरणाचे कामकाज विद्यापीठाकडून ऑक्टोबर 2012च्या परीक्षांपासून सुरु केलेले आहे. त्यास संलग्नित महाविद्यालये परिसंस्थांकडून उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. त्या अनुषंगाने, मार्च/एप्रिल/मे 2017 मध्ये एसआरपीडी प्रणालीमधून एकवीस अभ्यासक्रमांच्या सर्व सत्रांच्या प्रश्नपत्रिकांचे 293 केंद्रावर यशस्वीपणे वितरण करण्यात ल्याची माहितीही श्री. काकडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here