लोकराज्यच्या पोलीस विशेषांकाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रकाशन

‘आपले पोलीस, आपली अस्मिता ’विशेषांकाचे कौतुक

0

पालघर : ‘लोकराज्‍य’च्‍या ‘आपले पोलीस, आपली अस्मिता ’विशेषांकाचे कौतुक काल जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्ध केलेला लोकराज्यचा विशेषांक त्यांनी प्रकाशित केला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या अंकाची त्यांनी प्रशंसा केली.

या अंकात गुन्हे उकल करण्यासाठी तंत्रज्ञान, सायबरविषयक गुन्‍हे, दहशतवाद आणि नक्षलवाद्यांना चोख उत्तर, वाहतूक सुरक्षा, डिजिटल तपासाची स्मार्ट दिशा तसेच सायबर युगाची आव्हाने, सागरी सुरक्षिततेची सज्जता, 24 तास आपल्या सेवेत संकट समयी आठवतात ते पोलीस असे विविध विषय देण्यात आले असून यामुळे पोलीस दलाच्या कामगिरीविषयी वाचकांना माहिती कळेल, असा विश्वास मंजुनाथ सिंगे यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी लोकराज्य टीमला शुभेच्छा दिल्या. शोध आणि मुस्कान, धडक कारवाई आणि प्रतिबंध, तुमची सुरक्षा-तुमचे हित, डिजिटल तपासाची स्मार्ट दिशा अशा लेखांतून पोलिसांची कामगिरी कळते, याशिवाय सागरी सुरक्षितेची सज्जता, गृहरक्षक : निष्काम सेवा यासारख्या विषयांमुळे हा अंक वाचनीय झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here