जुन्नरमधील येणेरे येथे मुलींबरोबर संचालकानेच केले अश्लील चाळे

येणेरे येथील इंग्रजी माध्यमाच्या इंडियन इंग्लिश मेडियम मधील घटना

0

जुन्नर- जुन्नर तालुक्यातील येणेरे येथील इंग्रजी माध्यमाच्या इंडियन इंग्लिश मेडियम या शाळेचे संचालक असलेलं सचिन घोगरे यांनी शाळेत शिकणाऱ्या १२ ते १३ वर्ष वयोगटातील मुलीबरोबर अश्लील चाळे केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून याबाबत मुलींच्या पालकांनी जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.

येणेरे येथील या शाळेला अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.या वसतिगृहातील 240 मुले पालघर विभागात हलविण्यात येणार असल्याचे ठाणे विभागाचे अप्पर आयुक्त आदिवासी विभाग सी.के.डांगे यांनी सांगितले. या वसतिगृहाची इमारत बेकायदा बांधली असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे ही इमारतच बेकायदा ठरली आहे.तसेच या शाळेची मान्यता रद्द केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान या शाळेचे संचालक सचिन घोगरे यांनी शाळेत शिकणाऱ्या मुलींची कोणत्याही प्रकारे छेडछाड केली नसल्याचे दावा शाळेच्या मुख्याधिपिका व सचिन घोगरे यांच्या पत्नीने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here