गडहिंग्लज तालुक्यात आम. संध्याताई कुपेकरांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

0

गडहिंग्लज ( प्रतिनिधी ) : आज (दि १६) रोजी गडहिंग्लज तालुक्यातील औरणाळ, हेब्बाळ क| नुल, दुंडगे, हसुरचंपु, हानीमनाळ ह्या गावांत आमदार संध्याताई कुपेकर यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.

चंदगड विधानसभेच्या आमदार संध्याताई कुपेकर यांनी जणू विकासकामांचा विडा उचलून मतदारसंघातील हरएक विकासकामांचा शुभारंभ करत आहेत .आज त्यांनी गडहिंग्लज तालुक्यातील ५ विविध गावात वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ केला ह्यात हानीमनाळ येथे कुंभार समाजासाठी खुले सभागृह बांधण्यासाठी ५ लाख व यल्लम्मा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी ३ लाख उपलब्ध करून कामाचे उदघाटन केले. हसरचंपु येथे जरळी-दुंडगे-हसरचंपु रस्ता डांबरीकरणासाठी ७१ लाख व ‘क’ वर्ग यात्रास्थळ वाहनतळ तयार करण्यासाठी ५ लाखाचा निधी उपलब्ध करून उदघाटन केले. तसेच दुंडगे येथे संकपाळ वस्तीकडे जाणारा रस्ता डांबरीकरणासाठी ५ लाख व जलयुक्त शिवार योजनेतून दोन सिमेंट बंधारे बांधण्याकरिता २० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला व आज ह्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर हेब्बाळ क| नुल येथे नदी धाराकडे जाणारा रस्ता तयार करण्यासाठी ५ लाखाचा निधी उपलब्ध करून देत शुभारंभ केला व औरणाळ येथेही आमदार स्थानिक विकास निधी मधून मंजूर केलेल्या तात्याराव चव्हाण यांच्या घरापासून पुढे जाणाऱ्या रस्ता खड्डीकरण साठी ५ लाख व शिवलिंग गुरबे यांच्या घरापासून अण्णासो माने यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरणासाठी १ लाखाचा निधी उपलब्ध करून देत शुभारंभ केला. तसेच यापुढेही अशीच विकासकामे करत चंदगड विधानसभेतील गावांची एक वेगळी ओळख करून देणार असल्याचे आम. कुपेकरांनी म्हटले आहे.


आज या विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी डाॅ. नंदाताई बाभुळकर, बी एन पाटील मुगळीकर, रामाप्पा कारीगार, महाबळेश्वर चौगुले, जिल्हा मजुर संघाचे अध्यक्ष उदयराव जोशी, माजी पं स उपसभापती बनश्री चौगुले, माजी जि प सदस्य शिवप्रसाद तेली, केडीसीसी संचालक संतोष पाटील, माजी पं स उपसभापती तानाजी कांबळे, राजेश पाटील, अभिजीत पाटील, शिवाजीराव राऊत, राकेश पाटील,सरपंच, ग्रा.प.सदस्य, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here