धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांचे नीलम गोर्हेकडून सांत्वन

जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे जाऊन घेतली भेट

0

मुंबई- जानेवारी प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने, हतबल झालेल्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला. या सदर कुटुंबाचं सांत्वन करण्याकरिता नीलमताई गोर्हे यांनी आज जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे जाऊन भेट घेतली व त्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने आधार दिला.जमिनी ६७५ हेक्टर ३२ आर, तर भूसंपादनामार्फत संपादित जमिनी १९९ हेक्टर २७ आर आहेत. महाजेनकोने खाजगी वाटाघाटीने जमिनी संपादित करतांना मनमानी कारभार करून शेतकर्यांशी संवेदनाहीन वर्तन केले म्हणून त्यांच्याही तत्कालीन अधिकार्यांच्या चौकशीची व त्यांच्यावर कारवाईची मागणी आ.डाँ.नीलम गोर्हे यांनी केली आहे.

जेजे हॉस्पिटल येथे सुधारित नुकसान भरपाईबाबत पहाणीचे पत्र श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पाटील कुटुंबियांना देण्यात आले आहे. असे असले तरी या व इतर ज्या ज्या शेतकर्यांच्या मोबदल्याबाबत तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारींचे निराकरण महसूल, ऊर्जा या विभागांनी करावे असेही आ.डाँ. नीलम गोर्हे यांनी सरकारला सुचविले आहे व अधीवेशनातही त्याचा पाठपुरावा करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here