महाडिकांच्या उमेदवारीवर होणार निर्णय

0

प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार १२ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या पुरस्कार सोहळ्यानिमित्त ते कोल्हापूर दौऱ्यावर येत असले तरी या दौऱ्यांतर्गत अनेक राजकीय घडामोडी होणार आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी खासदार धनंजय महाडिक यांना देण्याबाबत मुंबई येथील बैठकीत निश्चित झाले असले तरी त्याबाबत अद्याप संदिग्धता आहे. त्यामुळे पवार यांच्या दौऱ्यामध्ये खासदार महाडिक यांच्या उमेदवारीवर शिक्केमोर्तब होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या निवडणुकीनंतर खासदार महाडिक यांची राजकीय वाटचाल पाहता ती राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या नेत्यांसाठी अडचणी ठरल्याची त्यांची तक्रार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत महाडिक यांनी पक्ष अथवा काँग्रेस आघाडीचे हित न पाहता सोयीची भूमिका घेतल्याचा दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये झालेल्या जिल्हातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा मुद्दा खुद्द शरद पवार यांच्यासमोर मांडला होता. तर गेल्या आठवड्यात मुंबई येतेच झालेल्या बैठकीत आमदार मुश्रीफ यांनीच कोल्हापूच्या जागेवर दावा केला होता. पण दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत आमदार मुश्रीफ यांनी पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे कार्यकर्त्याना आवाहन केले होते. मुंबईमधील बैठकीनंतर मुश्रीफ यांच्या भूमिकेत झालेला बदल पाहता कोल्हापूरच्या जागेबाबत खासदार महाडिकांच्या उमेदवारीवर शिक्केमोर्तब होईल अशी पक्ष पातळीवर चर्चा आहे. आघाडी धर्मानुसार राष्ट्रवादीची हातकणंगले मतदारसंघाची जागा खासदार राजू शेट्टी याना दिली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही जागांच्या उमेदवारीची पवार यांच्याकडून घोषणा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here