देवर्डे बंधाऱ्यावरील गावांना त्वरित पाणीपुरवठा नियोजन करा

0

आजरा (प्रतिनिधी) :
मौजे सुळेरान, दाभीळ व देवर्डे बंधाऱ्यावरील पाण्यावर सर्व शेतकरी शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यावर अवलंबून असून या सध्याच्या स्थिती वेळवट्टी, वारेवाडी, पेठेवाडी व साळगाव नदीपात्रात अत्यल्प पाणीसाठी उपलब्ध असल्याने तो पुढील दोन ते तीन महिन्यासाठी पुरेसा नसल्याने भविष्यात शेती व पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे या वस्तुस्थितीवर त्वरित लक्ष देऊन देवर्डे बंधाऱ्यातील पाणी मुक्त करावे. या मागणीचे निवेदन वेळवट्टी ग्रामस्थांनी आजरा पाटबंधारे विभागास दिले आहे.
या निवेदन म्हटले आहे की, परिस्थितील जलसंघाकडे असलेले सर्व एमआय टॅंक घटकरवाडी, धनगरमोळा व वेळवट्टी येथे मोठ्या प्रमाणात गळती असून पाणीसाठा जवळपास रिकामा होत आहे व या गळतीसाठी सदर गावांनी देखील त्यांचा कुठलाही उपयोग होऊ शकत नाही. परिणामतः बंधाऱ्यामधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. यासाठी समन्वय असणे गरजेचे आहे. या सद्यस्थितीत सुळेरान, दाभीळ व देवर्डे बंधारे पूर्णपणे भरलेले आहेत. यातील काही पाणीसाठा त्वरित मुक्त करून देवर्डे बंधाऱ्यावरील गावांना त्याचा उपभोग घेऊ दिला पाहिजे व दोन महिन्यांचे योग्य ते नियोजन लावून टप्प्या-टप्प्याने मुक्त करावा. तसेच या गावातील ऊस पिकांचे पाण्याअभावी फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाणीसाठा पुढील वर्षासाठी जर मिळाला नाही तर ऊस पीक ठेवायचे की नाही हा मोठा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करून देवर्डे बंधाऱ्यातील पाणीसाठा मुक्त करावा असे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर इंद्रजीत देसाई, वसंत कुंभार, बंडू वेंगूळकर, शिवाजी पाटील,पांडुरंग पाटील, नारायण पाटील, सुरेश कुंभार, सुधाकर कळेकर, संभाजी कुंभार, सुधीर देसाई इत्यादी शेतकऱ्यांनी आपली आर्थिक हानी टाळावी असे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here