देवर्डे येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

0

आजरा (प्रतिनिधी) :

विद्यामंदिर देवर्डे रवळनाथ हायस्कूल देवर्डे (ता. आजरा) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी नववी इयत्तेच्या वर्गाने बालसभेचे आयोजन केले होते. सुरेखा कांबळे या विद्यार्थिनीने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारले. कल्पना चावलाच्या वेषात सुजाता कांबळे ही विद्यार्थिनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती. प्रतिमापूजन विद्यार्थिनींच्या हस्तेच करण्यात आले. या वेळी नववीच्या मुलींनी “कोमल है, कमजोर नहीं” हे गीत सादर केले. भूमी देशमुख ह्या आठवीच्या विद्यार्थिनीने भावनाशील मनोगत व्यक्त करून सर्वांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले.

शिक्षक सुनील सुतार व देवेंद्र शिखरे यांनी नारीसन्मानार्थ मनोगतं व्यक्त केली. संयोगिता सुतार, रेश्मा बोलके व वंदना चव्हाण यांनी मनोगतांतून कृतज्ञता व्यक्त करतानाच विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. निकिता पोवार व साक्षी तेजम या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले, आभार गिरीजा पाटील हिने मानले.

यानिमित्त दुसरीच्या मुलींनी परींचा वेष, तिसरीच्या मुलींनी मॉडर्न गर्लचा वेष, चौथीच्या मुली संत, वारकरी, शेतकरी, मराठमोळी, इंदिरा गांधींच्या वेषांत, पाचवीच्या मुली अंतराळवीरांगना, शास्त्रज्ञ, डाॅक्टर, झाशीची राणी, जिजाऊ या वेषांत, सहावीच्या मुली इंदिरा गांधी, जिजाऊ, डाॅक्टर, शिक्षिका, झाशीची राणी या वेषांत तर सातवीच्या मुलींनी महाराष्ट्रीयन स्त्रीचा वेष परिधान केला होता.

कार्यक्रमास मुख्याध्यापक तानाजी चव्हाण, सुभाष सावंत, राजेंद्र पाटील, चंद्रकांत घुरे, महेश नावलगी, महादेव तेजम, रेश्मा बोलके, धनाजी चाळके आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here