मनपा आयुक्तांची स्थायी समिती सभेत पहिल्यांदाच उपस्थिती पीएमसी ला ब्लॅकलिस्ट करण्याची स्थायी सभेत मागणी

0

राजू म्हस्के
शहरातील भूमिगत गटार योजनेत ५० ते ६० कोटीचे नुकसान झाल्याचा आरोप करत या योजनचे कंत्राट असलेल्या पीएमसीला ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी आज महापालिकेच्या स्थायी सभेत सदस्यांनी करून भूमिगत गटार योजनेचे प्रकल्प प्रमुख अफसर सिद्दीकी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली.महापालिकेच्या स्थायी सभेत शहरातील पाणी, रस्ते, तसेच भूमिगत गटार योजनेबाबत सदस्यांनी आक्रमक होत प्रशासकीय अधिकाऱ्यांना खुलासे मागितले. भूमिगत गटार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अफसर सिद्दीकीच्या निलंबनाबाबत कारवाईची मागणी यावेळी सदस्यांनी केली. या योजनेबाबत अनेक त्रुटी आढळल्या असून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला जाऊ नये असा प्रश्न राजू वैद्य यांनी उपस्तीत केल्या नंतर पहिल्यांदाच स्थायी सभेत पहिल्यांदाच उपस्तीत असलेले आयुक्त मुगळीकर यांनी दोषींना नोंटिस देऊन खुलासा करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगत सखोल चौकशी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. भूमीगत गटार योजनेत झालेल्या भ्रष्टचाराबाबत मुखमंत्र्यांना चोकशी समिती नेमन्यास विनंती करणार असल्याचे राजू वैदय यांनी सांगितले. यावर स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी याबाबत चौकशी करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे प्रशासनास आदेशीत केले. सभेच्या प्रारंभे नवनिर्वाचित महापौर नंदकुमार घोडले यांचा सत्कार सभागृहाच्या वतीने करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here