जोगेश्वरीतील एशियन केमिकल कंपाउंडमध्ये भीषण आग 

सुदैवाने कोणतीही जीवितहानि नाही

0

प्रतिनिधी- पूनम पोळ

मुंबई : जोगेश्वरी येथील एशियन केमिकल कंपाउंडमध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग काही मिनिटातच भडकली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

जोगेश्वरीमधील सुभाष रोड, इस्माईल युसूफ कॉलेजच्या बाजूच्या एशियन केमिकल कंपाउंडमध्ये पहिल्या मजल्यावरील गाळ्याला गुरुवारी रात्री अचानक आग लागली.काही वेळातच हुई आग भडकून लेवल – २ ची आग झाली. असून याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ४ फायर इंजिन व ४ वॉटर टँकर यांच्या साहाय्याने रात्री उशिराने आगीवर नियंत्रण मिळविले.   मात्र ही आग का व कशामुळे लागली याचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस व अग्निशमन दल यांच्याकडून या घटनेची चौकशी सुरू असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here