नगरसेवक सुनील मिरकर यांची शिवसेनेला जय महाराष्ट्रची घोषणा

0

राजू म्हस्के

औरंगाबाद: शिवसेनेत वरिष्ठांच्या दुर्लक्ष, स्थानिक पदाधिकाऱ्यांची मनमानी पहाता व शिवसेनेची सत्ता असुन देखिल कार्येकर्त्यांची होणारी घुसमट पाहता आपल्या असंख्य कार्येकर्त्यांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत असल्या ची घोषणा  सिल्लोड- सोयगाव विधानसभा शिवसेनेचे नेते व नगरसेवक गटनेते सुनिल पाटील मिरकर यांनी केली

गुरुवार (दि 9) रोजी शहरालगतच्या स्वस्तिक (लान्स) मंगल कार्यालय डोगरगाव फाटा येथे आयोजित बैठकीत मिरकर बोलत होते.

यावेळी किसान सेना तालुका प्रमुख कैलास वराडे उपतालुका प्रमुख सुभाष करवंदे (सिल्लोड) गणेश लोखंडे (सोयगावं)नगरसेवक राजेन्द्र शिरसाट युवा सेनेचे मा.तालुका प्रमुख प्रवीण मिरकर, विभाग प्रमुख पंकज जैस्वाल ,तुकाराम गाडेकर , यांची प्रमूख उपस्थिती होती.

या वेळी बोलतांना मिरकर यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्या वर पक्ष पातळी वर कोणतेही मदत न मिळाल्यावर देखील अवघ्या दहा दिवसांत स्वबळावर सोळा हजार मते मिळवले . या निवडणुकीत पराभूत झाल्या नंतर ही संघटना बांधण्याचे काम करीत पक्षाचा ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यात एकही सरपंच नसतांना जवळ पास 17 गावात पक्षाचे सरपंच निवडून आणले. एक नगरसेवक असतांना दहा नगरसेवक केले.मतदार संघातील गावा गावात शिवसैनिकांचे जाळे विनले ज्या गावात विधान सभेला एकाच मत मिळले होते त्या गावात अभुतपुर्व यश मिळवुन दिले माञ पक्ष पातळीवर सामान्य शिवसैनिकांच्या प्रश्नाबाबत असलेले दुर्लक्ष आपसातील गटबाजी या सर्व प्रकारात वैतागुन व जिल्हाप्रमुख  नरेद्रं ञिवेदी यांच्या  मनमानी कारभार निष्क्रीय कार्यकत्यांना पदे देणे काम करण्यांर्याची गळचेपी करणे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना संघटनेची पदे देणे यामुळे पक्षाची जनमानसात प्रतिमा मलिन होत होती जिल्हाप्रमुख  ञिवेदी यांनी आर्थिक व्यवहार ठरवुन संघटनेचे वाटोळे लावने सुरुच ठेवल्याने आजच्या बैठकीत असंख्य पाठीराख्यांसह पक्षाला जय महाराष्ट्र करीत असल्याची  घोषणा सुनिल मिरकर यांनी करत पुढील राजकीय निर्णय सिल्लोड सोयगाव विधान सभा मतदार संघातील लोकांशी विचार विनिमय करुन ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी……  मनोज राजपूत, धोंडीराम गुंजाळ, शिवाजी बनकर, प्रभू भोटकर,शिवाजी गुंजाळ, अंकुश शिंदे, विश्वानाथ पाडळे,अभिजित गोरे, सुरेश पाटील, विजय राठोड, बबन शिंदे, चंदू गोगे,राजू महाकाळ, दादाराव शिंदे, विष्णू काकडे, भीमराव बदर,संतोष मिरगे,नाना जाधव, नितीन शिनगारे, अजय थोरात, रवी काकडे,दीपक आकोळकर, विष्णू मिरगे,आशिष कर्नावट, योगेश साळवे, स्वप्नील शिनगारे,अविनाश हिवाळे,योगेश सोनवणे,सोनू अहेरराव,ज्ञानेश्वर नेवारे, प्रमोद साळवे, अक्षय पंडित,सचिन मिरकर,संदीप नेव्हारे, विजय बारवाल, चंदू गोंगे,  या वेळी उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here