नगरपंचायतीची ग्रामपंचायत करा ! आजरा येथील बैठकीत व्यापाऱ्यांची मागणी ; वाहतूक नियोजनाबाबत चर्चा

0

आजरा : आजरा नगरपंचायत झाल्यापासून शहरातील स्वच्छता, आरोग्य व वाहतूक यासह कोणतीच विकासकामे झाली नसल्याने ग्रामपंचायतच बरी होती. आता नगरपंचायत पुन्हा ग्रामपंचायत करा, अशी थेट मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष दिवाकर नलावडे यांनी केली. शहरात अनेक प्रश्न प्रलंबितच राहत असलेल्या पाश्वभूमीवर वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात बैठकीत केलेल्या या मागणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. बैठकीत अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे होते.
स्वागत संजय यादव यांनी केले. यावेळी नलवडे म्हणाले, शहराची बाजारपेठ हि मर्यादित स्वरूपाची आहे. या बाजारपेठेमध्ये वाहतुकीचे नियोजन करताना वाहनांची संख्या व उपलब्ध जागा यांचा ताळमेळ घालणे आवश्यक आहे. मुख्य बाजारपेठेलागत असणाऱ्या गल्ल्यांमध्ये व्यापारीवर्गाकडे येणारी मालवाहने थांबवून माळ उतारण्याबरोबर एकेरी वाहतूक अवलंबणे गरजेचे आहे. अशोकअण्णा चराटी म्हणाले, वाहतुकीच्या कोंडीचा विषय हा संवेदनशील बनला असून यापूर्वी अनेकवेळा यासंदर्भात बैठक झाल्या आहेत. यामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका महत्वाची आहे. व्यापाऱ्यांच्या सहकार्यावर या समस्येचे निराकरण अवलंबून आहे. विजयकुमार पाटील यांनी वाहतुकीसाठी पर्यायी असणारे रस्ते, त्यावरील वर्षानुवर्षे थांबून असलेली वाहने दूर करून मोकळे करून घ्यावेत. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे सांगितले.
नगरसेवक विलास नाईक यांनी वागतुकीचा प्रश्न पोलीस प्रशासन, नगरपंचायत, महसूल विभाग व बांधकाम विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुटू शकतो. सुरुवातीला याचा त्रास होईल, परंतु सवय लागल्यानंतर सर्व सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी झालेल्या चर्चेत उपगराध्यक्ष आलम नाईकवाडे, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे, आनंदा कुंभार, यशवंत इंजल, संभाजी पाटील, दत्त शिंदे यांनी भाग घेतला.
बैठकीस नगरसेविका संजीवनी सावंत, सुमैया खेडेकर, संगम गुंजाटे, शुभदा जोशी, रेश्न सोनेखान, सीमा पोवार, शकुंतला सालमवाडे, सिकंदर दरवाजकार, किरण कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

चराटी – सावंत यांची खडाजंगी
वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या कारणास्तव नगरपंचायतीने स्थनिक फळ व भाजी मंडईत बसणे बंधनकारक केले आहे. या पाश्ववभूमीवर संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी विक्रेत्यांनी आंदोलन केले. हा धागा पकडत अशोकआण्णा चराटी चांगलेच संतापले. आम्हीही विक्रेत्यांच्या बाजूनेच आहोत, परंतु, वाहतुकीला अडथळा होत असेल तर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी प्रयन्त सुरु आहे. अशावेळी बाहेरच्या मंडळींनी येऊन आम्हाला शहाणपण शिकाऊ नये, असे सावंत यांना सुनावले. यावेळी सावंत व चराटी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here