भाजपच्या विरोधात कडेगाव मध्ये काँग्रेसने काढला मोर्चा.  

काँग्रेस आमदार मोहनराव कदम यांच्या पुतळा दहन प्रकरणी भाजपाच्या निषेधार्र्थ आज कडेगाव मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला .युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनीहि या मोर्च्या मध्ये सहभाग घेतला .तहसील कार्यालयावर यावेळी मोर्चा काढत भाजपा कार्यकर्त्यांना अटक करुन कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली . 

0

काँग्रेस आमदार आणि भाजपाचे सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद आज तिसऱ्या दिवशीही कडेगाव मध्ये उमटले आहेत .भाजपा कार्यकर्त्यांनी शनिवार मोहनराव कदम यांच्या प्रतिकात्मम पुतळ्याचे दहन केले होते . यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी याविरोधात रास्तारोको करून निषेध नोंदवला होता . मात्र पुन्हा भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार कदम यांच्या पुतळ्याचे पलूस मध्ये दहन करण्याचा प्रयत्न केल्याने.संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज कडेगाव मध्ये भव्य मोर्च्या काढत भाजपाचा निषधे नोंदवला . यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या पट्ट्या बांधत शहरातील प्रमुख मार्गावरून कडेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला . यामोर्च्या मध्ये युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनीही सहभाग घेतला . यावेळी भाजपा कार्यकर्त्यां अटक करण्यात यावी अशी मागणी तहसीलदरा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली . याप्रसंगी बोलताना विश्वजित कदम यांनी भाजपाकडून जेष्ठ आमदारांचा पुतळा दहन करणे म्हणजे असंस्कृतीचे लक्षण असल्याची टीका भाजपा नेत्यांवर केली . 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here