काँग्रेस पक्षाकडून नौदलाचे अभिनंदन

काँग्रेस कमिटीने खास पात्र लिहून केले अभिनंदन

0

प्रतिनिधी- अभयकुमार देशमुख

मुंबई- २६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतमातेचे कित्येक शूरवीर शाहिद झाले. हा हल्ला समुद्रमार्गे झाला होता त्यामुळे अशाच त-हेचा समुद्रमार्गाचा वापर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याकरिता पुन्हा होऊ शकतो, हे गुप्तचर विभागाच्या अनेक अहवालातून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षिततेकरिता कोणतीही हयगय होता कामा नये हे अभिप्रेत असणे सहाजिकच आहे. याच अनुषंगाने २६/११ च्या हल्ल्यानंतर अधिक सतर्कता अभिप्रेत असल्याप्रमाणे नौदलाने ब-याच अंशी दक्षता घेत सागरी प्रहारी बल स्थापन केले आहे.
मात्र सध्या उद्योजक, कॉर्पोरेट्स स्वतःच्या फायद्याकरिता अनेक खासगी प्रकल्प आणत आहेत ज्यात देशाच्या सुरक्षिततेचा कोणताच विचार केला जात नाहीये आणि प्रशासनावर देखील दबाव टाकला जात आहे. मात्र यातच मुंबईच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपण हेलिपॅड असेल वा तरंगते हॉटेल सारख्या प्रकल्पांना विरोध करून नौदलाने अभिनंदनपात्र काम केले आहे असे म्हणत काँग्रेस कमिटीने नौदलाचे अभिनंदन या पत्राद्वारे केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here