बीड जिल्ह्यातही संगणक परिचालकांचे आंदोलन जोरात!!!

0

आष्टी,माजलगाव,शिरूर व वडवणी तालुक्यातील संगणक परिचालक बेमुदत आमरण उपोषणावर…

संगणक परिचालकांचे थकीत मानधन,मानधनावर टास्क कन्फेर्मशन ची जाचक अट, शासकीय मान व सेवा सुविधा मिळाव्या या व इतर अटींसाठी सुरु असलेले आंदोलन आज एका नवीन टप्प्यावर आले असून आजपासून सर्व संगणक परिचालकांनी बेमुदत आमरण उपोषण घोषित केले आहे. या आंदोलनात बीड जिल्ह्यातील बरेच तालुके समाविष्ट असून तेथील आमरण उपोषण सुरु झाले आहे.
आष्टी तालुक्यात सिद्धेश्वर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वडवणी तालुक्यात अध्यक्ष किशोर शेंडगे व उपाध्यक्ष बाबाराव विर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संगणक परिचालक आमरण उपोषणाला बसले आहेत. तसेच शिरूर व माजलगाव येतेही परिचालकांनी आमरण उपोषण घोषित केले आहे.या सर्व तालुक्यातील संघटनांचे तालुकाअध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य पंचायत समितीजवळ आमरण उपोषणाला बसले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्व परिचालक उपोषणाला बसले असताना सरकार यांची काय दखल घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here