राज्यातील ग्रामपंचायतीमधील संगणक होणार ठप्प..

0

प्रतिनिधी: राज्यातील 27 हजार ग्रामपंचायतीमध्ये असलेले संगणक येत्या 12 ऑक्टोबर पासून ठप्प होणार आहेत. ग्रामपंचायतीमध्ये असलेले संगणक परिचालक हे कामबंद आदोलन करणार असल्याने राज्यातील सर्व ग्रामीण जनतेला आपल्या विविध कांमांसाठी रखडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपले सरकार सेवाकेंद्रात काम करणा-या या हजारो संगणक परिचालकांना फेब्रुवारी 2017 पासून मानधन मिळालेले नाही, तर काहींना डिसेंबर 2016 पासून मानधनापासून वंचित रहावे लागले आहे. ग्रामविकास विभागाने लावलेल्या टास्क कन्फर्मेशन या जाचक अटीमुळे ही अडचण निर्माण झाली आहे. संग्राम प्रकल्प संपल्यानंतर या प्रकल्पासाठी काम करणा-या परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्रात सामावून घेण्याबाबत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी वारंवार आश्वासने दिली मात्र, त्याबाबत पूर्तता झाली नाही. त्यामुळे 25 सप्टेंबरपासून सुरू झालेले हे आंदोलन आता 12 ऑक्टोबर पासून अधिक तीव्र करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. संगणक परिचालकांना, संगणक परिचालक किंवा केंद्रचालक म्हणून संबोधावे तसेच शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे सेवासुविधा द्याव्यात. टास्क कन्फर्मेशन ही जाचक अट रद्द करून शासन कर्मचा-यांप्रमाणे ६००० रु. इतके वेतन प्रत्येक महिन्याला एकाच तारखेला द्यावे. संग्राम प्रकल्पामध्ये कार्यान्वित असलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील सर्व संगणक परिचालकांना या प्रकल्पात सामावनु घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी येत्या प्रत्येक पंचायतीसमोर 12 ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here