विद्यापीठामध्ये मूलभूत जीवशास्त्र या विषयावर कार्यशाळा संपन्न

0

विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र व पर्यावरणशास्त्र अधिविभागांतर्गत सायन्स ॲकॅडमी मार्फत मूलभूत जीवशास्त्रया विषयावर दिनांक १६ ते १८ ऑगस्ट असे तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.    या कार्यशाळेअंतर्गत विविध विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ॲकॅडमी ऑफ हायर इज्युकेशन धारवाड येथील गव्हर्मेटं ऑफ कर्नाटकाचे माजी संस्थापक प्रा. एस. के. सैदापुर, नॅकचे माजी डायरेक्टर व बेंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. एच. ए. रंगनाथ व प्राणीशास्त्र अधिविभागाचे प्रभारी विभागप्रमुख प्रा. पी. डी. राऊत हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. एस. आर. यंकंची यांनी केले आहे.

      या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये प्रा. एच. ए. रंगनाथ यांनी मेंडेलिअन जिन्स् टू जिनोम्स् : ॲन ओव्हरव्हयू अँड ॲन इंट्रोडक्शन टू सिंथेटिक जिनोमस् या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, प्रा. एस. के. सैदापुर यांनी मेजर लैंडमार्कस् इन बायोलॉजी अँड पॉवर ऑफ इव्हॅल्युएशन  या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. एस. आर. यादव, यांनी रोल ऑफ बायोलॉजिस्टस् इन कौंझर्व्हेशन ऑफ प्लांट डायव्हर्सिटी विथ स्पेशल रेफरन्स टू वेस्टर्न घाटस् अँड सम न्यू प्लांट डिस्कव्हरीज अँड देअर इंप्लिकेशनस् या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. टी. डी. नांदेडकर यांनी ॲडव्हान्सेस इन आयव्हीएफ-इटी अँड नॅनो-टॉक्सीसीटी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व डॉ. बी. ए. शानबाग रिप्रोडक्टीव्ह स्टॅ्‌रटेेजीज इन व्हर्टेब्रेटस् अँड बायोलॉजी ऑफ एजिंग या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

      कार्यशाळेच्या सांगता समारंभामध्ये प्राणीशास्त्र अधिविभागाच्या अनघा भोई, अक्षय कांबळे, कुरेशी, प्रगती सांळुखे, व ए. जी. एम च्या माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच संशोधक विद्यार्थ्यांनेही आपले मनोगत व्यक्त केले व न्यु कॉलेजच्या प्रा. कविता गाजरे, वारणानगर कॉलेजच्या प्रा. आप्पासाहेब भुसनर  यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेच्या सफलतेसाठी सर्व प्राध्यापक, विभागतील कर्मचारी, संशोधक विद्यार्थी, यांनी विशेष योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here