कोवाडला उद्या पासून सीएम चषक कबड्डीचा थरार

0

कोवाड : कोवाड येथे शनिवार दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सी.एम. चषक कबड्डी स्पर्धेचा थरार पहायाला मिळणार आहे. श्रीराम विद्यालयाचा मैदानावर चंदगड मतदान संघासाठी स्पर्धा होत आहेत.
प्रथम संघाच्या विजेता संघाला १५०००, व्दितीय १००००, तृतिय ७००० व सहभागी स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी असलेले प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्ध्येचे उद्घाटन कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोवाडच्या सरपंच सौ. अनिता भोजन भूषविणार आहेत. यावेळी भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, जी.प. सदस्य हेमंत कोळेकर, भाजपनेते रमेश रेडेकर, भाजप तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, दि. किणी कर्यात शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अशोकराव देसाई आदींसह क्रीडाप्रेमी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here