स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा पालघर येथे संपन्न

स्पर्धकांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता या विषयी आपले मत व अनुभव या वक्तृत्व करंडक स्पर्धेत मांडले.

0

पालघर-योगेश चांदेकर

स्वच्छ भारत अभियानात युवा वर्गाचे बहुमुल्य योगदान आहे. त्यांनी मांडलेले विचार या अभियानाला नवी दिशा देऊ शकतात तसेच स्वच्छ आणि सुदृढ भारत निर्माण करण्याच्या या कार्याला यशस्वी करू शकतात असे मत जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी व्यक्त केले आहे. ते पाणी व स्वच्छता विभागा मार्फत आयोजीत केलेल्या वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या उद्घाटना समारंभाप्रसंगी बोलत होते. या स्पर्धेसाठी तालुक्यातून निवडण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयतून १६ तर वरिष्ठ महाविद्यालयतून १४ विद्यार्थी सहभागी झाले होते. या दोन्ही गटांचे परिक्षण रमाकांत पाटील, अध्यक्ष, पालघर जिल्हा पत्रकार संघ, तृप्ती मोरे आणि दर्शना चौधरी, प्राध्यापिका सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या मार्फत करण्यात आले.

उपस्थित स्पर्धकांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता या विषयी आपले मत व अनुभव या वक्तृत्व करंडक स्पर्धेत मांडले. सर्वच स्पर्धकांची तयारी व सादरीकरण उत्तम रित्या झाल्याचे दिसून आले, परीक्षकांना ही विजेता निवडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले. यात कनिष्ठ महाविद्यालय या गटातून प्रथम क्रमांक कु. सप्रिम अशोक म्हसकर, वसई, दुत्तीय क्रमांक कु. समिधा वासुदेव ठाकरे, वाडा आणि तृतीय क्रमांक कु.रिंजड मिथुन जानु, विक्रमगड यांनी तर वरिष्ठ महाविद्यालय या गटातून प्रथम क्रमांक कु. योगिता रामचंद्र भुवड, पालघर, दुत्तीय क्रमांक कु. ऋतुजा मधुकर पाटील, वसई आणि तृतीय क्रमांक कु. कुणाल विजय ठाकरे, वाडा  यांनी पटकावला. या वेळी पाणी व स्वच्छता विभागा मार्फत घेण्यात आलेय स्वच्छता सुरभी या उपक्रमाचे बक्षीस ही प्रदान करण्यात आले. सदर उपक्रमांची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिलारे, पाणी व स्वच्छता विभाग यांनी आपल्या प्रस्ताविकेतून दिली. तसेच स्वच्छ सिद्धांत स्पर्धेतून स्वच्छ संकल्प अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत लघुपट निर्मितीत दीपक देसले यांना जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून यावेळी त्यांनाही सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पंधरा हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आले. प्रसंगी दांडेकर महाविद्यालयाचे सचिव ठाकूर आणि प्राचार्य किरण सावे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here