कोल्हापुर स्वच्छ राहण्यासाठी ‘क्लीन कोल्हापूर’ मोहिम

श्री अंबाबाई मंदिर परिसरात होणार रविवारी शुभारंभ

0

 

कोल्हापूर – विविध क्षेत्रात कोल्हापूरचे नाव देशपातळीवर गाजत असते. कोल्हापूरच्या नावलौकीकामध्ये भर व्हावी, यासाठी कोल्हापुरातील सामाजिक संस्थेेने पुढाकार घेतला आहे. कोल्हापूर स्वच्छ राहण्यासाठी ‘क्लीन कोल्हापूर’ च्या मोहिमेचा प्रारंभ रविवारी 1 आॅक्टोबरला श्री अंबाबाई मंदिर परिसरात सकाळी 7 वाजता होणार आहे.

या मोहिमेत प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिमा पाटील म्हणाल्या की, स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे गंभीर आजाराला सामोरे जावे लागते, अनेकांना जीव गमवावा लागतो. यासाठी ही ‘क्लिन कोल्हापूर’ ही स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. कोल्हापुर शहरात विविध ठिकाणी ही मोहिम राबविणार आहे, यासाठी कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्थानी पुढाकार घ्यावा.

कोल्हापूर रोटरी मुव्हमेंट, इनरव्हील क्लब, आॅयस्टर जैन्स ग्रूप, कोल्हापूर युथ किंग, जैन युवामंच,क्रिडाई कोल्हापूर, मुक्ता, मातोश्री वृध्दाश्रम, अवनि, एकटी व्हाईट आर्मी, अमिताभ फॅन्स क्लब वल्र्डवाईड, महिला बचत गट आदी सामाजिक सेवा संस्था या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here