स्वछ पाण्यासह उत्तम आरोग्यासाठी सदैव प्रयत्नशील : आजरा उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे

1

आजरा ( प्रतिनिधी ) : आज ( दि.१३) रोजी नाईक गल्लीतील संतप्त रहिवाशी विहिरीतील दूषित पाण्यामुळे झालेल्या गॅस्ट्रोसदृश लागण झाल्यामुळे आजरा नागरपंचायतीत जाब विचारायला गेले असताना आजरा उपनगराध्यक्ष व आरोग्य समिती सभापती आलम नाईकवाडे यांनी समजूत काढत ह्यावर सकारात्मक आश्वासन दिले.
नाईक गल्लीतील इंचनाळकर यांच्या घराशेजारील विहिरीचे पाणी गेली अनेक वर्षे पिण्यासाठी वापरत आहेत. शनिवारी अचानक पाच जणांना उलट्या व जुलाबचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि दुसऱ्यादिवशी देखील तेथील अजून काही राहिवाश्यांना हाच त्रास होऊ लागल्याने कळून आले की विहिरीतील पाणी पिल्याने हा त्रास झाला आहे.

नगरपंचायतकडून पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्वरित येथील नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा ह्यासाठी नाईक गल्लीतील रहिवाशी आज नगरपंचायतमध्ये आले असता उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे व नागरिकांत ह्यावेळी प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी पाण्यासोबतच आरोग्यास हानिकारक ठरतील अश्या गोष्टींवर आपले बारीक लक्ष असून ह्यावर नगरपंचायतद्वारे कारवाई पण सुरू आहे असे आश्वासन नाईकवाडे यांच्याकडून देण्यात आले. तसेच नगरपंचायत कडून भविष्यात अजून काही उपाययोजना राबविण्यात येणार आहे ह्याचीही नागरिकांना माहिती देण्यात आली.
अखेर चर्चेनंतर नागरिक आलम नाईकवाडे यांच्या आश्वासनावर समाधानी असल्याचे दिसून आले. ह्यावेळी बैठकीत नगरसेवक किरण कांबळे व नगरसेविका रेश्मा सोनेखान देखील उपस्थित होत्या.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here