13 फेब्रुवारी रोजी शिंदेवाडीत भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान

0

मुरगूड प्रतिनिधी
कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथे सरपिराजीराव घाटगे तालमीच्या वतीने बुधवार (ता.13) रोजी मातीवरील निकाली कुस्त्यांचे भव्य मैदान आयोजित केल्याची माहिती बिद्रीचे संचालक दत्तामामा खराडे व वस्ताद एकनाथ मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने,छत्रपती शाहु सहकारी साखर कारखाना पुरस्कृत असणाऱ्या या कुस्त्या सर पिराजीराव गुळ उत्पादक सोसायटी समोरील भव्य पटांगणावर दुपारी 3 वाजता होणार आहेत.चार लाखाहून अधिक खर्च असणाऱ्या या स्पर्धेत शंभराहून अधिक चटकदार कुस्त्या होणार आहेत.प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट् केसरी पै.संतोष दोरवड विरुद्ध महान भारत केसरी पै.योगेश बोंबाळे यांच्यात तर दोन नंबरची कुस्ती पै.उदयराज पाटील मोतीबाग तालीम विरुद्ध पै.विक्रम वडकिले महाराष्ट्र चँम्पीयन यांच्यात होणार आहे.
अन्य कुस्तीमध्ये पै.रोहन रंडे ( साई आखाडा ) वि.पै .निरपाल दड्डी मोतीबाग, पै.शशिकांत बोगार्डे (शाहु साखर ) वि. इंद्रजित मगदूम (इंचलकरंजी),पै.गणेश डेळेकर (मुरगुड) वि.पै.अमोल बागवान (शाहुपुरी तालीम), पै.सतिश आडसूळ (मोतीबाग) वि.पै.राघू ठोंबरे (सातारा), पै.श्रीराम वाडकर (शाहु साखर) वि.पै.प्रथ्वीराज पाटील (साई आखाडा), पै.किरण पाटील (ईस्पुर्ली ) वि पै.लखन सुळ सातारा, पै.शुभम पाटील (म्हाकवे) वि.पै.अक्षय पाटील (मोतीबाग), व अन्य कुस्त्याचा समावेश आहे.
सुमारे दोन लाखांची बक्षिसे मल्लांना देण्यात येणार आहेत. उद्घाटन सर पिराजीराव ट्रस्टचे अध्यक्ष विरेंद्रराजे घाटगे यांच्या हस्ते,मैदान पूजन आनंदराव जालीमसर यांच्या हस्ते होईल.तर स्पर्धेचे बक्षीस वितरण पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील,नगराध्यक्ष राजेखान जमादार, एम.पी.पाटील,दत्तामामा खराडे,रामचंद्र खराडे,सुनीलराज सुर्यवंशी,बाबासाहेब पाटील,संजय पाटील,वसंत पाटील,विजय मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थीतीत होणार आहे.
पत्रकार परिषदेस वस्ताद गजानन खराडे,दगडू माळी,संतोष गुजर,अशोक खराडे,मानसिंग शिंदे,ओंकार खराडे,सागर शिंदे,विजय शिंदे,सचिन खराडे,महेश शिंदे आदी प्रमुख उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here